कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार : १२ आॅगस्टला घर परिसरात शोध मोहीमराजकुमार चुनारकर चिमूरसगळीकडे पाऊस सुरू असून अनेक गावात नदी, नाले, डबके पाण्याने भरलेले दिसुन येत आहेत. काही ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी वाढली आहे. शिवाय घरामध्ये किंवा आजुबाजुच्या भांड्यामध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. अशा डेंग्यूच्या अळ्या शोधण्याचे काम १२ आॅगस्ट रोजी विद्यार्थी करणार असून त्यात जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे.हिवताप अधिकारी कार्यालयाकडून डास नियंत्रण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना क्रियाशिलरित्या सहभागी करून घेण्यासाठी १ ते १५ आॅगस्ट दरम्यान हा पंधरवडा ‘शालेय डेंग्यू जागृती मोहीम’ म्हणून साजरा केल्या जात आहे. पावसाळ्यात जागोजागी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. शिवाय घरामध्ये किंवा आजुबाजुला भांड्यामध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत शिक्षण विभागाला हा उपक्रम राबविण्याबाबत पत्र देण्यात आले असून या मोहिमेत सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शाळा प्रमुख, शिक्षक विद्यार्थ्यांचा सहभाग सहकार्य अनिवार्य करण्यात आला आहे.आरोग्य विभागाकडून केल्या जात असलेल्या जनजागृतीच्या मोहीमेस सहकार्य करण्याबाबत पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे आता जि.प. शाळेसह खाजगी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी घराघरात डेंग्यूच्या डासाचा शोध घेणार आहेत. शिक्षकांना दिली डेंग्यूची माहितीडेंग्यू जनजागरण मोहीमेमध्ये शिक्षकांना डेंग्यू कसा ओळखावा याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. या मोहिमेत सहभागी प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना डेंग्यू डास लागणाची माहिती देण्यात आली आहे. डासांच्या अंगावर, पायावर, पोटावर, काळे, पांढरे पट्टे असतात. ते केवळ दिवसाच चावतात. तर स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. त्यांना ‘टायगर मस्कीटो’ असेही म्हटतात, अशी माहिती शिक्षकांना दिली आहे. ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांना कसे सांगावे, याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रमया मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना डेंग्यू डासाविषयी माहिती मिळावी, त्यांच्यात जनजागृती निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात ९ आॅगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा (डेंग्यू जागृती, उपाययोजना स्वच्छता), १० आॅगस्ट रोजी चित्रकला स्पर्धा (डेंंग्यू पसरविणारा-एडीस डास), ११ आॅगस्ट रोजी आकलन परीक्षा (डेंग्यू विषयक आकलन), १२ आॅगस्ट रोजी डास शोध मोहीम, (घरोघरी सभोवताल डास शोधने) १३ आॅगस्ट रोजी कोरडा दिवस (डास अळी आढळुन आलेल्या घरांना भेटी देणे) तसेच १५ आॅगस्ट रोजी प्रतीज्ञा पुरस्कार (डेंग्यू विषयी प्रतीज्ञा वाचन) पुरस्कार वितरण होणार आहे.डेंग्यू जनजागृती मोहिमेमध्ये जिल्हा परिषदेपासून तर माध्यमिक खाजगी शाळेतील वर्ग ५ ते १२ वीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांना डेंग्यू बाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी आपल्या घरात स्वच्छता ठेवून डेंग्यूपासून परिवाराला दूर ठेवण्याकरिता प्रयत्न करणार आहेत.- डॉ. दिगांबर मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिमूर
विद्यार्थी घेणार घरात डेंग्यू डासांचा शोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:43 IST