शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उपस्थिती भत्त्यापासून राज्यातील विद्यार्थिंनी राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:41 IST

यावर्षी मार्च महिन्यापासून शाळाच बंद असल्याने विद्यार्थिंनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

ठळक मुद्दे राज्य शासनाने १९९२ मध्ये सुरु केली योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिंनीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी १९९२ मध्ये राज्य सरकारने अनुसुचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विद्यार्थिंनीना प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले. मात्र यावर्षी मार्च महिन्यापासून शाळाच बंद असल्याने या विद्यार्थिंनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

तीन दशकांपूर्वी राज्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थिंनीचे उपस्थिती प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे राज्य शासनाने १९९२ मध्ये इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थिंनींसाठी प्रतिदिवस एक रुपया प्रमाणे अनुदान देण्याची योजना सुरु केली. यासाठी संबंधित विद्यार्थिंनींना शाळा सुरु असलेल्या दिवसाच्या ७५ टक्के उपस्थित राहणे अनिर्वाय करण्यात आले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शाळांतील मुलींच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले. दरम्यान, यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासूनच शाळांना सुटी देण्यात आली. त्यातच नवे शैक्षणिक सत्र सुरु होऊनही अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. त्यामुळे विद्यार्थिंनींच्या प्रोत्साहन भत्त्याचे काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.महागाई वाढली, मात्र भत्ता जैसे थेतत्कालीन राज्य सरकारने दुर्बल घटकातील विद्यार्थिंनींची शाळेत उपस्थिती वाढविण्यासाठी ही योजना सुरु केली होती. यासाठी प्रतिदिवस विद्यार्थिंनींना एक रुपया दिला जातो. या योजनेला तीन दशकाचा कालावधी लोटला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढली आहे. मात्र दिला जाणारा भत्ता जैसे थै आहे. एक तर भत्ता वाढवून द्यावा किंवा योजनाच बंद करून टाकावी, असे मतही पालक व्यक्त करीत आहेत.शिक्षकांनाही मनस्तापदुर्बल घटकातील विद्यार्थिंनींना प्रतिदिवस उपस्थिती भत्ता एक रुपया दिला जातो. मात्र शिक्षकांना प्रत्येक महिन्यातील विद्यार्थिंनींची ७५ टक्के उपस्थिती वरिष्ठांकडे पाठवावी लागत आहे. यामुळे दरमहिन्यातील या कामामुळे आता शिक्षकही त्रासले आहे.विद्यार्थिंनींची शाळांत उपस्थिती वाढविण्यासाठी शासनाची योजना चांगली आहे. मात्र महागाई बघता त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शाळा बंद असल्याने भत्ता देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेऊन लाभ द्यावा.-जे.टी.पोटेशिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र