शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग खोलीअभावी विद्यार्थी बसतात झाडाखाली

By admin | Updated: December 9, 2015 01:39 IST

पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडेखल येथे सन २०१४-१५ पासून वाढीव वर्ग सुरू झाले.

कोंडेखल जिल्हा परिषद शाळा : शिक्षण विभागाचे दुर्लक्षउपरी : पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडेखल येथे सन २०१४-१५ पासून वाढीव वर्ग सुरू झाले. मात्र दोन वर्षापासून येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतने शिक्षण विभागाकडे वाढीव वर्ग खोलीची मागणी करूनही संबंधित विभागाने येथे इमारत बांधून दिली नसल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या संदर्भात येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत तथा गावातील प्रतिष्ठिातांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. कोंडेखल हे एक हजार लोकसंख्येचे गाव असून येथील जिल्हा परिषद शाळेत एक ते पाचपर्यंत वर्ग आहेत. इमारती मात्र दोनच असल्याने पाच वर्ग घ्यावे कसे, बसावे कुठे, असा प्रश्न मागील दोन वर्षापासून शिक्षकांना पडला आहे. सद्या जिल्हा परिषद शाळेत असलेल्या दोन इमारतीमध्ये एक इमारतीतील वऱ्हांड्यात कायारलय व खोलीमध्ये दोन वर्ग बसतात. तर दुसऱ्या इमारतीतील वऱ्हांड्यात शाळेचे काही तुटलेले लोखंडी, लाकडी भंगार सामान व खोलीत दोन वर्ग बसतात. सन २०१३-१४ पर्यंत या शाळेत पहिली ते चवथीपर्यंत वर्ग असल्याने व्यवस्था होत होती. परंतु सन २०१४-१५ मध्ये पाचवा वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोली नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षापासून येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतने शिक्षण विभागाकडे, सर्व शिक्षण अभियान अंतर्गत वर्ग खोलीची मागणी केली. मात्र येथे अजूनही संबंधित विभागाकडून वर्ग खोली देण्यात आलेली नाही. त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेचा एक वर्ग शाळा परिसरातील एका झाडाखाली घ्यावा लागत आहे. झाडाखाली वर्ग बसत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या झाडाखाली वर्ग बसतो त्या झाडावर कावळे, बगळे व इतर पक्षी बसून विस्टा करतात. शाळेला पूर्णत: संरक्षण भिंत नाही. त्यामुये अनेकदा वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांचा लक्ष वळत असते. तेव्हा शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून कोंडेखल शाळेसाठी इमारत बांधून द्यावी अशी, मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर मंडोगडे व पदाधिकारी तसेच सरपंच ईश्वर ठुणेकार, उपसरपंच करिष्मा उंदिरवाडे, किशोर उंदिरवाडे, मोरेश्वर गोहणे, काशिनाथ महारे, पद्माकर पेंदोर, विनायक ठुणेकार व गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. (वार्ताहर)