शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:35 IST

विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली......

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात सूसज्ज अभ्यासिका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली या वास्तुतील ही अभ्यासिका आहे. चंद्रपुरातील गरजू, हुशार, चिकित्सक व अभ्यासू मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम आपण करू शकलो, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची २५ सप्टेंबरला जयंती आहे. त्यांना मान्यवरांनी रविवारी अभिवादन केले. १४ जुलै रोजी बाबूपेठमधील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले होते. यावेळी त्यांनी या सभागृहाच्या बेसमेंटमध्ये अद्यावत अभ्यासिका उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्याचे लोकार्पण झाले. या विक्रमी वेळेतील कामाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्र्यांनी महानगर पालिकेला धन्यवाद दिलेत.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभापती अनुराधा हजारे, सभागृह नेता वसंत देशमुख उपस्थित होते. तसेच खोब्रागडे कुटुंबातील मृणालिनी गिरीष खोब्रागडे, गौतमी डोंगरे, देशक खोब्रागडे, सत्यजित खोब्रागडे, प्रवीण खोब्रागडे, या स्मारकासाठी जागा देणारे स्नेहल देवानंद रामटेके, प्रतिक डोरलीकर आदी उपस्थित होते .यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी चंद्रपूर शहरात शामाप्रसाद मुखर्जी व बाबा आमटे अभ्यासिकेनंतर बाबूपेठ परिसरात बॅरिस्टर खोब्रागडे सभागृहात आणखी एक अभ्यासिका उभी राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील भावी पिढीसाठी अभ्यासिका महत्त्वपूर्ण कार्य आहे. मूल येथे उभारण्यात आलेल्या शामा प्रसाद मुखर्जी अभ्यासिकेतील मुलांना अभ्यासाची ओढ लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूर जिल्हयातील मुले जेव्हा या अभ्यासिकेतून अभ्यास करून केंद्र्र, राज्य व शासनाच्या विविध सेवा परीक्षेतून विविध पदावर नियुक्त होतील. ती खरी बॅरिस्टर साहेबांना श्रद्धांजली ठरेल. आपल्यालाही समाधान मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या घरात अभ्यासासाठी जागा नाही, वातावरण नाही, शांतता नाही, मात्र शिक्षणाच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्याची जिद्द आहे. अशा जिद्दी, गुणवान व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही जागा उपयोगी पडणार आहे, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त संजय काकडे यांनी तर संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले. यावेळी नगरसेविका वंदना तिखे, शितल गुरुनुले, पुष्पा उराडे, माया उईके, वंदना जांभूळकर, निलिमा आकेवार, ज्योती गेडाम, आशा आबुजवार आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य- हंसराज अहीररस्ते, विकास, पायाभूत सुविधांचे निर्माण, यासोबतच गुणवान, अभ्यासू विद्यार्थांसाठी अभ्यासिका निर्मितीचे प्रेरणादायी काम जिल्हयात सुरू आहे, याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ही अभ्यासिका परिसरातील सर्व स्तरातील जनतेच्या ज्ञानार्जनासाठी कामी येईल, असे त्यांनी सांगितले. आमदार नाना शामकुळे यांनी विक्रमी वेळेत पालकमंत्री महोदयांच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महापौर अंजली घोटेकर यांनी पालकमंत्री यांनी दिलेल्या अभिवचनाला वेळेत पूर्ण करू शकलो, याचे समाधान व्यक्त केले. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करणारे महापालिकेचे आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अभियंता विजय बोरीकर, अभियंता महेश बारई या टीमला शब्दसुमनाने गौरविण्यात आले.