शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ध्येय ठेवावे

By admin | Updated: July 17, 2014 23:59 IST

महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी सदैव डोळ्यासमोर ध्येय ठेवावे. तेव्हाच पुढील जीवनात यशस्वी व्हाल, असे मनोगत प्राचार्य डॉ. जे.ए. शेख यांनी व्यक्त केले.

संवाद कार्यक्रम : जे.ए.शेख यांचे प्रतिपादनचंद्रपूर : महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी सदैव डोळ्यासमोर ध्येय ठेवावे. तेव्हाच पुढील जीवनात यशस्वी व्हाल, असे मनोगत प्राचार्य डॉ. जे.ए. शेख यांनी व्यक्त केले. स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाद्वारे प्रथम वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, यासाठी आयोजित प्राचार्य- प्राध्यापक- विद्यार्थी यांच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. शेंडे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आर. पी. इंगोले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश सोमलकर, डॉ. के. बी.मोहरील आदींची उपस्थिती होती.ते पुढे म्हणाले, वाणिज्य विभाग हा गोंडवाना विद्यापीठातील शंभर टक्के आचार्य पदवी प्राप्त नियमित प्राध्यापक असलेला विभाग असून विद्यार्थ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अशा प्राध्यापकांकडून तुम्ही शिकणार असल्यामुळे तुम्ही उत्तम विद्यार्थी म्हणून तयार व्हावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयीन शिस्तीच्या अनुषंगाने काही सूचनाही यावेळी प्राचार्यानी विद्यार्थ्यांना केल्या. प्रास्ताविकेतून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आर. पी. इंगोले यांनी संयुक्त सभा आयोजनामागची भूमिका विषद केली. विद्यार्थी व पालकांनी या महाविद्यालयात प्रवेशाला पहिली पसंती दिल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत सर्व पालकांचे आभार मानले. महाविद्यालयाद्वारे आयोजित सर्व विद्यार्थीभिमुख उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांन केले. संचालन प्रा. तृप्ती वानखेडे यांनी केले तर आभार वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश सोमलकर यांनी मानले. या संयुक्त सभेत वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)