शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST

हायस्पीड सेवेचा अभाव ; ग्राहक त्रस्त चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक तालुका स्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा नसल्याने, ग्राहक हायस्पीड इंटरनेट ...

हायस्पीड सेवेचा अभाव ; ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक तालुका स्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा नसल्याने, ग्राहक हायस्पीड इंटरनेट सेवेपासून वंचित आहेत. डिजिटल इंडियाची पाळेमुळे रोवताना या बाबीची पूर्तता होण्यासाठी तालुका स्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्रावणबाळ लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत

चंद्रपूर : श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून, त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे. बहुतांश तालुक्यातील लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसाठी निवड करण्यात आली.

कार्यालयात तक्रार पेट्यांची मागणी

चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असतात. काही जण त्या प्रत्यक्ष सांगू शकत नाही. अशांना आपल्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रार पेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व तक्रार पेट्या गायब झाल्या आहेत.

रामसेतूकडे पोलीस गस्त वाढवावी

चंद्रपूर : येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रामसेतू पुलाकडे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. युवक-युवतींचा मोठा गराडा असतो. अनेक जण सेल्फी काढण्यासाठी गर्दी करीत असतात, परंतु येथून मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

महागाई कमी करण्याची मागणी

चंद्रपूर : मागील काही महिन्यांत महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहे. पूर्वीच कोरोनामुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच सततच्या दरवाढीने आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कर्ज वितरण मोहीम राबवावी

चंद्रपूर : कोरोनाने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच नोकरभरती बंद आहे. परिणामी, अनेक जण बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारांसाठी कर्ज वितरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. शासनाकडून बेरोजगारांसाठी अनेक मोहीम राबविण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही.