आवळगाव : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी नवीन गणवेशासाठी शाळेपुढे ठिय्या आंदोलन केले. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांची चांगलीच धांदल उडाली.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश देण्याची तरतूद आहे. त्यासाठी निधीही येतो. मात्र आवळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील स्वातंत्र्यदिन येवूनही गणवेश देण्यात आले नाहीत. परिणामी येथील विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. यामुळे मुख्याध्यापक भैसारे व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर पालकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. (वार्ताहर)
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांचे आंदोलन
By admin | Updated: August 15, 2015 01:19 IST