शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाच्या ‘दांडी’मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By admin | Updated: August 27, 2015 01:18 IST

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दमपूर मोहदा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे या-ना त्या कारणाने वारंवार आजारी रजेवर जात असल्याची ओरड...

तब्बल तीन महिने आजारी रजा : अधिकाऱ्याकडून मुख्याध्यापकाची पाठराखणचंद्रपूर: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दमपूर मोहदा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे या-ना त्या कारणाने वारंवार आजारी रजेवर जात असल्याची ओरड गावकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे शाळेची प्रशासकीय व शैक्षणिक कामे वारंवार खोळंबून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील शैक्षणिक सत्रात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून ९५ हजार चा निधी प्राप्त झाला होता. परंतु त्यांनी शौचालय बांधकाम पूर्ण न करता निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. याप्रकरणात केंद्र प्रमुख व संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे कळते. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. षटकोनी इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्याची आतापर्यंत कुठलीही डागडूजी झालेली नाही. तरीसुद्धा त्याच इमारतीत वर्ग बसवण्याचे तोंडी आदेश मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुखांनी शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळेतील संगणक कक्षाची अतिशय दुरावस्था झाली आहे. संगणक बंद स्थितीत असून धूळ खात पडून आहेत. मुख्याध्यापकांनी संगणक दुरुस्तीची कुठलीही तसदी घेतली नाही. मुलांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नाही. शालेय पोषण आहाराचा दर्जा पूर्णपणे घसरला आहे. जेवणात भाजीपाल्याचा अजिबात पत्ता नसतो.साठा नोंदवहीत खूप मोठी तफावत असल्याची माहिती आहे. तसेच शालेय अभिलेखे शाळेत न ठेवता स्वत:च्या घरी ठेवतात. शैक्षणिक साहित्य निर्मिती अनुदान गेल्या पाच वर्षापासून शिक्षकांना वाटप केलेले नाही. मागील सत्रात दोन विद्यार्थ्यांच्या बनावट स्वाक्षरी करुन आदिवासी शिष्यवृत्ती हडप करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष पसरलेला आहे.सदर मुख्याध्यापक मागील शैक्षणिक सत्रात शाळेच्या सुरुवातीलाच म्हणजे ३० जून २०१४ ते ४ आॅगस्ट २०१४ पर्यंत आजारी रजेवर होते. त्यानंतर त्याच सत्रात १५ डिसेंबर २०१४ ते ६ मे २०१५ पर्यंत तब्बल सात महिने आजारी रजेवर होते. ते ७ मे २०१५ म्हणजेच सत्राच्या शेवटच्या दिवशी शाळेत स्वत:हून हजेरी पटावर स्वाक्षरी करुन रुजू झाले. यावरून ते कामचुकारपणा करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तरीसुद्धा त्यांच्या सेवा पुस्तकात आठ महिन्यांच्या अर्जीत रजा शिल्लक नसतानाहीसुद्धा त्यांच्या आजारी रजा कालावधीतील वेतन बील काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पाणी नक्कीच कुठेतरी मुरले, असा नागरिकांना संशय येत आहे. त्यामुळे सदर मुख्याध्यापकाची जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर चौकशी व्हावी, यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांच्यावर तडका- फडकी बदली करण्यात यावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)