शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले

By admin | Updated: September 18, 2016 00:55 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासन नानाविध योजना राबवित असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे.

कंत्राटदाराचा मनमानी कारभार : दिले जात आहे निकृष्ट आणि अपुरे जेवण चंद्रपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासन नानाविध योजना राबवित असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे. पोटभर आणि विद्यार्थ्यांनी ठरविलेला मेनू जेवणात द्यावाच लागेल, असा शासकीय नियम असतानाही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि अपुरे जेवण दिले जात आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी काल शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.येथील समाजकल्याण विभाग कंत्राटदाराच्या मदतीने सध्या वरणभात नावाचा उपक्रम राबवित असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सर्व नियम सबंधित कंत्राटदार पायदळी तुडवित आहे. विद्यार्थ्यांना पुरेसे अन्नही देत नाही. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.समाजकल्याण विभागाचे येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. जिल्हाभरातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्टया कमकुवत विद्यार्थी येथे राहतात. प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे येथे एकूूण ६५ विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील खानावळीचे कंत्राट अग्रवाल नामक व्यक्तीला मिळाले आहे. मागील दोन वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नियमानुसार विद्यार्थी आणि कंत्राटदार मिळून मेनू सांगतात. तो सर्वसंमतीने ठरल्यानंतर तो द्यावाच लागतो. परंतु कंत्राटदार मनात येईल तसे जेवण विद्यार्थ्यांना देतो. याची तक्रार केली तर कंत्राटदाराकडून दमदाटी केली जाते. त्यामुळे आजपर्यंत प्रकरण वसतिगृहाच्या बाहेर आले नव्हते. मात्र अखेर विद्यार्थ्यांचा राग गुरुवारी रात्री अनावर झाला. कंत्राटदाराने विद्यार्थ्यांना केवळ वरण आणि भातच खायला दिले. विद्यार्थ्यांनी खाण्यास नकार दिला. संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना केल्या. त्यानंतर रात्री दीड वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळाले. दरम्यान नेहमीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.गृहपाल रात्री उपस्थित नसतातया वसतिगृहात गृहपाल म्हणून महिला आहे. त्या सध्या प्रसूती रजेवर आहेत. त्यांच्या जागी वरोरा येथील एकाची प्रभारी गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेही रात्री उपस्थित नसतात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.