शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मूलच्या बसस्थानकावर रात्री ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:29 IST

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली.

ठळक मुद्देबस आलीच नाही : नियंत्रकांचा खासगी बसने जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित, येरगाव या गावाकडे जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनीना मूलच्या बसस्थानकावर तब्बल पाच तास ताटकळत बसची वाट पाहावी लागल्याची पाळी आली. सायंकाळी ५ वाजता बसस्थानकावर आलेल्या विद्यार्थ्यांना रात्री १० वाजता दुसºया बसची सोय उपलब्ध झाल्यानंतर परतीचा प्रवास करावा लागला. बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांनी मात्र विद्यार्थ्यांना यादरम्यान, खाजगी बसने जाण्याचा सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप विद्यार्थी व प्रवाशांनी केला आहे.राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या या मतदार संघात विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी सतत तत्परता दाखविली जाते. असे असताना एस.टी. महामंडळाच्या कर्मचाºयांच्या हेकेखोर प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना २८ आॅगस्टला त्रास सहन करावा लागला. मूल तालुक्यातून टेकाडी गावाजवळ येणाºया बसमध्ये बिघाड झाल्याने बस आली नाही. इयत्ता ११ व १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी बसची वाट बघत होते. सायंकाळ झाली तरी बस न आल्याने विद्यार्थी चांगलेच वैतागून गेले. याबाबत बसस्थानकावर कामावर असलेल्या नियंत्रकांना विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याचे काम केले. त्यानंतर विद्यार्थी व प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन याबाबत चंद्रपूर आगाराला कळविण्यात आले. दोन तासानंतर बस येईल, त्यानंतर गावाकडे जाता येईल, असे सांगण्यात आले. मात्र रात्री १० वाजता विद्यार्थ्यांसाठी बस आली आणि विद्यार्थी घरी परतले. विशेष म्हणजे, यावेळी बसस्थानकावर एक बस उपलब्ध असल्याने तीच बस येरगाव, पिपरी दीक्षित गावाकडे पाठविण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली. मात्र कर्मचारी नसल्याचा बहाना करुन विद्यार्थी व पालकांना हुलकावनी देण्यात आली. बस उपलब्ध असताना कर्मचाºयांचा बहाना करुन विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रकार अशोभनिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मानव विकास मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाने एसटी महामंडळाला बसेस पुरविल्या. मात्र ज्याच्यासाठी बसेस आहेत, त्यांनाच ताटकळत राहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.बसविषयी बसस्थानकावर असलेल्या नियंत्रकांना विचारणा केली असता विद्यार्थी व प्रवाशांनी खाजगी बसेसनी जावे. याबाबत आपण काहीच करु शकत नाही, असे बोलून त्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर चंद्रपूरला याबाबत कळविले. दोन तासांनी बस येईल, असे सांगण्यात आले. रात्री जवळपास १० वाजता बसची व्यवस्था झाली.- ताराचंद नागापूरे माजी सरपंच येरगाव