शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:13 IST

येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘बस द्या बस’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. मूल येथे ग्रामिण भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बसगाड्या अनियमित सुटत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरात ताटकळत उभे रहावे लागते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देमूल बसस्थानक : अनियमित बसगाड्यांमुळे विद्यार्थी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘बस द्या बस’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले.मूल येथे ग्रामिण भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बसगाड्या अनियमित सुटत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरात ताटकळत उभे रहावे लागते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी या मार्गावरचे विद्यार्थी सकाळी ७.३० वाजतापर्यंत मूलला पोहचतील, तर दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता व बुधवारी ३ वाजता मूलवरून नियमित बसगाड्या सोडाव्या. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच पास संपल्याचे सबब देत विद्यार्थ्यांची पास बंद करण्यात येत असल्याने पासची मुद्दत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.परिवहन मंडळाच्या अधिकाºयांनी सर्व मार्गावर बसगाड्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मागण्यांचे निवेदन चंद्रपूरचे आगार व्यवस्थापक एस. व्ही. डफळे, वाहतूक अधीक्षक ए. बी. बोबडे, वाहतूक निरीक्षक एच. बी. गोवर्धन, वाहतूक निरीक्षक एस. सी. मेघावत, मूलचे वाहतूक नियंत्रक एन. डी. पठाण यांनी स्वीकारले. यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, अमित राऊत, गौरव श्यामकुळे, अमर कड्याम, रवि शेरकी, शहनाज बेग, विशान नर्मलवार, संगिता गेडाम उपस्थित होते.