शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

विद्यार्थ्यांनो, सेवाभावी वारसा जपा

By admin | Updated: September 2, 2015 00:42 IST

येथे नव्यानेच स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला मंगळवारी विद्यार्थ्यांच्या उत्साहात सुरुवात झाली.

दीपक म्हैसेकर : वैद्यकीय महाविद्यालयाचे सत्र सुरू

चंद्रपूर : येथे नव्यानेच स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला मंगळवारी विद्यार्थ्यांच्या उत्साहात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे ‘विंग्ज आॅफ फायर’ हे पुस्तक देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. चंद्रपूर जिल्हयाला रुग्णसेवेचा वारसा असून वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात हा वारसा जपावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी छोटेखानी स्वागत समारंभात केले.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, प्रो.डॉ. संजय कुबडे, प्रो.डॉ. वाय.आर. कुळकर्णी, प्रो.डॉ.अभय हात्तेकर, डॉ. शैलेंद्र धवने, डॉ.एम.व्ही. बिमनपल्ली, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अशोक भुक्ते, डॉ.अनंत हजारे, डॉ.मंगेश गुलवाडे यावेळी उपस्थित होते. भारतीय वैद्यकीय परिषदेने परवानगी दिल्यानंतर चंद्रपूर येथे आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम सत्रास सुरुवात झाली आहे. पहिल्या वर्षात ८५ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला असून यात ४३ विद्यार्थींनी व ४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.एमबीबीएसचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम या महाविद्यालयात शिकविण्यात येणार आहे. त्याचबरोबर थेअरीसाठी ७५ टक्के तर प्रात्यिक्षकांसाठी ८० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, हे महाविद्यालय नवीन असल्याची शंका मनातून काढून टाका. या ठिकाणी सर्व सुविधा देण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला आहे. काही त्रुटी असल्यास प्रशासनाच्या नजरेस आणून दयाव्यात, असेही ते म्हणाले.