शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्साहात

By admin | Updated: June 26, 2014 23:08 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. गुरुवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकदिन साजरा करण्यात आला.

गावागावातून प्रभोधन रॅली: जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी दिली भेटचंद्रपूर : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. गुरुवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकदिन साजरा करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांना पुस्तक वितरीत करण्यात आले.पहिल्या दिवशी घोडपेठ येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी रामदास पाटील उपस्थित होते. तर लोहारा येथील शाळेला मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी रामटेके, विस्तार अधिकारी बाबुराव मडावी आदी उपस्थित होते. चिंचाळा तसेच पांढरकवडा येथे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी भेट देवून पहाणी केली. तर, बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत शाळांमध्ये डायट कॉलेजचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी भेट दिली. तत्पूर्वी प्रत्येक गावांमध्ये शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती केली. तसेच नवगतांचे स्वागत करण्यात आले. कोणीही शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये यासाठी शिक्षक तसेच शाळा समिती सदस्यांनी गृहभेटी दिल्या. सकाळपासून ध्वनिवर्धकावर देशभक्तीपर गीत वाजवून शाळेत येणाऱ्या बालकांच्या मनात देशाविषयीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत केले. (नगर प्रतिनिधी)