शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:21 IST

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा गोंधळ : मोफत पुरवठ्याचा बोजवारा

सुरेश रंगारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके शासनाकडून पुरविली जातात. शासनाची यंत्रणा शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधीच पुढील सत्राची विद्यार्थ्यांची संभाव्य संख्येची माहिती शाळांकडून मागविल्या जाते. त्यानुसार पुस्तकांची छपाई केली जाते. त्यानुसार शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पुरवठा अपेक्षित आहे. २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्यास आठवडा पुर्ण होत आहे. तरीही विद्यार्थ्यांना पुर्ण विषयाचे पुस्तके मिळाले नाही. केंद्रामध्ये पुस्तके पाठविण्यात आले. मात्र त्यात पुस्तकांचा पुरवठा अपुरा होता.पुस्तके वाटप करतानाही मागणीनुसार वाटप न करता काही शाळांना जास्तीचे तर काही शाळांना कमी पुस्तकांचे वाटप केल्याने संस्थेनुसार पुस्तके विद्यार्थ्यांना मिळू शकले नाही व अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिले. काही विद्यार्थी जुन्या पुस्तकांचा वापर सुरू केला आहे. मात्र यावर्षी आठवीच्या वर्गाची पुस्तके बदलविण्यात आली असल्याने जुने पुस्तके वापरू शकत नाही व पुस्तके बाजारात विक्रेत्याकडे उपलब्ध नाही. परिणामी आठवीचे विद्यार्थी पुस्तकाविना शाळेत जात आहेत. पुस्तके विद्यार्थ्यांना न मिळाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.बल्लारपूर तालुक्यात बारा हजार पुस्तकांची मागणीबल्लारपूर तालुक्यात १२ हजार पुस्तकांची मागणी करण्यात आली. मागणीनुसार मराठी, हिन्दी, उर्दू, तेलगु माध्यमांची तसेच सेमी मराठी, हिंदी, उर्दू व तेलगु माध्यमाची पुस्तके पुरवठा करण्यात आला. मात्र वाटपात सावळागोंधळ झाल्यामुळे व शिक्षकांची अधिकचे पुस्तके घेतल्याने विद्यार्थ्यांना विषयानुसार पुस्तके मिळू शकली नाहीत.गणवेशाचीही प्रतीक्षाशासनाच्या सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम अन्वये वर्ग १ ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ६०० रू. अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रावधान आहे. शाळा सुरू झाल्यापुस्तके प्राप्त होत आहेत. मात्र विद्यार्थी व पालक गणवेश घेण्यासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने नवीन गणवेश खरेदी केल्या गेला नाही. विद्यार्थी शाळेत रंगीत कपड्यात येत आहेत.तालुक्यातील शाळेच्या मागणीनुसार पुस्तकांचा साठा केंद्रस्तरावर पाठविण्यात आला. मात्र केंद्रातून पुस्तक वाटपात गोंधळ उडाला. काही शाळांना विषयांकीत तसेच पुरेसे पुस्तके प्राप्त झाली नाहीत. आढावा बैठक घेवून त्यात जास्त पुस्तके प्राप्त शाळातून परत मागवून कमी गेलेल्या शाळांना पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल.-शोभा मडावी, गटशिक्षणाधिकारी,बल्लारपूर पंचायत समिती.