शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी

By admin | Updated: August 13, 2015 01:46 IST

लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शहरातील गांधीनगर प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ५ मध्ये घडली.

अनागोंदी कारभार : ब्रह्मपुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील घटनाब्रह्मपुरी : लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शहरातील गांधीनगर प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ५ मध्ये घडली. सोहम जितेंद्र मेश्राम असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता चवथीत आहे. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. लोखंडी गेटचे बांधकाम एक महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र गेटचे थातूरमातूर काम केल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्याला सोसावा लागत आहे. शाळा प्रशासन व वॉर्डवासी यांच्यात अजूनही खटके उडत असताना शाळेत मुलांना गणवेष वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सोहम जितेंद्र मेश्राम हा चौथ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी गेट मधून जात असताना अचानक गेट त्याच्या अंगावर कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शाळेची कथा व गाथा उजेडात आली आहे. यापूर्वी ही शाळा बागेच्या प्रकरणावरून वॉर्डातील नागरिक, शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षक यांच्यातील वाद गाजला होता. या प्रकरणाची लेखी तक्रार वॉर्डातील नागरिकांनी संबंधित विभागाला केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी याला केराची टोपली दाखवून शिक्षकांना अभय दिले असल्याचा आरोप वॉर्डवासियांचा आहे. शाळेचे अनेक प्रकरण गाजत असून प्रशासन कार्यवाही का करीत नाही, असा वार्डवासीयांचा रोष आहे. शाळेच्या विकासाऐवजी मनात येईल तसे सोयीचे काम करणे, वागणे, पालकांना व वार्डवासीयांना विचारात न घेणे आदी प्रकारामुळे शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता खालावत चालली आहे. याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधितावर योग्य कार्यवाही करावी अशी वार्डवासीयांकडून मागणी होत आहे. याची शिक्षण विभागाने दखल घ्यावी. (प्रतिनिधी)