शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

आधार कॉर्डसाठी विद्यार्थिनीची पायपीट

By admin | Updated: July 5, 2017 01:10 IST

तालुक्यातील अनेक व्यक्तींचे आधारकॉर्ड अजूनही निघाले नाही. परिणामी पसिरातील शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी भासत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील अनेक व्यक्तींचे आधारकॉर्ड अजूनही निघाले नाही. परिणामी पसिरातील शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी भासत आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा येथील विद्यार्थिनी मागील एका वर्षापासून अधारकॉर्डसाठी प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही तिला आधार कॉर्ड मिळाले नाही. अनेक महाआॅनलाईन सेवा केंद्रातून तिला आधार कॉर्ड विना परतावे लागले असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती व इतर योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधार कॉर्ड देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील चांगेश्वरी निळकंठ नैताम नामक मुलीने ग्रामपंचायत देवाडा खुर्द येथे आई-वडीलांसोबत चार वर्षापूर्वी आधार कॉर्ड नोंदणी केली. त्यावेळी हे काम एका खाजगी एंजन्सीला देण्यात आले होते. सबंधीत कंत्राटदारांने कुठल्याही प्रकारची पावती लाभार्थ्यांना दिली नाही. नोंदणी केलेल्या अनेकांचे आधार कार्ड टपाल कार्यालयामार्फत पोहचता करण्यात आले. परंतु, त्यातील अनेकांचे आधार कार्ड मिळालेच नाही. असाच प्रकार चांगेश्वरीच्या बाबतीत घडला आहे. तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना आधार कार्ड मिळाले. परंतु दोन वर्षे लोटूनही तिचे आधार कार्ड पोहोचलेच नाही. तेव्हा नव्याने आधार कॉर्ड तयार करण्यासाठी ती आपल्या वडिलासोबत पोंभुर्णा, बल्लारपूर, कोठारी, मूल, चंद्रपूर आदी ठिकाणी असलेल्या महाआॅनलाईन सेवा केंद्रामध्ये गेली असता, प्रत्येकांनी यापूर्वीच आधार कॉर्डची लिंक झाली असल्याने आता नव्याने आधार कॉर्ड निघणे शक्य नसल्याचे सांगितले. तर यापूवी आधार कॉर्ड काढतांना मिळालेली पावती आणण्यास सांगीतले जाते. मात्र त्यावेळी कुठलीही पावती देण्यात आली नाही. मात्र नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी दुसरा पर्यायच नसल्याचे सांगीतले. त्यामुळे चांगेश्वरीची आधारकॉर्डसाठी पायपीट सुरु आहे.विद्यार्थिनीची जिल्हाधिकाऱ्यांकडे धावशासनाने एकीकडे सर्व स्तरावर आधार कॉर्डची सक्ती केली आहे. तर दुसरीकडे संघर्ष करूनसुध्दा आधार कॉर्ड निघत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे. चांगेश्वरीने पोंभुर्णा येथील तत्कालीन तहसीलदार हरीश गाडे यांचेशी संपर्क साधून आधार कॉर्डबद्दल विचारले असता, कार्यालयात अर्ज करण्यास सांगितले त्यानुसार त्या ठिकाणी अर्ज सादर करुन एक वर्षाचा कालावधी लोटला. परंतु, त्यांनी सुध्दा कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थीनी व पालकांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन अर्ज दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला सदर माहिती पाठविणार आहेत. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी आधार कॉर्ड निघणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी चांगेश्वरीला सांगितले.शिष्यवृत्तीपासून वंचित राहणारदेवाडा खुर्द येथील चांगेश्वरी ही विद्यार्थीनी बल्लारपूर येथील एका इंजिनीअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून ती शासकीय वसतिगृहात राहून शिकत आहे. वसतिगृह, व शिष्यवृत्तीसाठी आधार कॉर्डची गरज आहे. मात्र तिच्याकडे आधार कॉर्ड नसल्याने अडचण निर्माण होत आहे.