शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आहाराच्या जाचक अटीविरूद्ध विद्यार्थी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:23 IST

शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा विरोध करीत तो निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले.

ठळक मुद्देसम्यक विद्यार्थी आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा विरोध करीत तो निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले.शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी दैनंदिन मेनूप्रमाणे भोजन दिले जात होते. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा होता मात्र कोणतेही कारण नसताना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने जुनी अट रद्द करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आहाराची रक्कम जमा करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सोयीचा नसून आर्थिक गैरव्यवहाराला चालणा देणारा आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय रद्द करावा, न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार जो भ्रष्टाचार झाला आहे. आणि त्यावरील करंदीकर समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागाने दोषी अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच गैरव्यवहार करणाºयांकडून रक्कम वसुली करावी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारांवर कारवाई करून शैक्षणिक साहित्याचा दर्जा सुधारावा, सायकली, खेळांचे साहित्य हे ब्रॅण्डेड कंपन्यांचे पुरविण्यात यावे, आश्रम शाळांची दुरुस्ती ही सर्टिफाईड आर्किटेक्टच्या सल्ल्यानुसार नामवंत बांधकाम कंपनीकडून करण्यात यावी, आश्रम शाळेच्या इमारतीच्या खोल्यांचे वर्षातून दोन वेळा दुरुस्ती करावी तसेच जंतुनाशक फवारणी करावी, आदिवासी विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करावी, तसेच त्यांना आरोग्य पत्रिका देण्यात यावी, वसतिगृह आणि आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना विनामूल्य ब्रॅण्डेड सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा बारमाही करावा, आदा मागण्यांचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग, मिथून खोब्रागडे, विनोद बोरीकर, मनोज लांडे, शिरीजकुमार गोगुलवार, तिरुपती जिमडी, सागर वरघणे, अविनाश सोदरकर, आम्रपली कांबळे, सचिन ठावरी, अभय डोंगरे, लोकेश कोटरंगे आदी उपस्थित होते.