शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

लालफितशाहीत अडकले घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:38 IST

स्थानिक रहिवाशी प्रशांत किसन खोब्रागडे या लाभार्थ्यास पंतप्रधान घरकूल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पंचायत समितीकडून लाभार्थ्याच्या घराची मोका चौकशी करुन कागदपत्रांसह बँकेच्या खात्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देपात्र व्यक्तीवर अन्याय : मंजूर घरकूल बांधून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : स्थानिक रहिवाशी प्रशांत किसन खोब्रागडे या लाभार्थ्यास पंतप्रधान घरकूल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पंचायत समितीकडून लाभार्थ्याच्या घराची मोका चौकशी करुन कागदपत्रांसह बँकेच्या खात्याची मागणी करण्यात आली. मात्र लाभार्थ्यांचे नाव आॅनलाईन होण्यास वर्ष लोटले तरीही प्रकरण मंजूर झाले नाही. त्यामुळे लाभार्थी अजूनही घरकुलपासून वंचित आहे. कर्मचाऱ्यांच्या लालफीतशाहीत उदासिनतेमुळेच हा अन्याय झाला, असा आरोप खोब्रागडे यांनी केला आहे.सामाजिक व आर्थिक जनगणना २०११ नुसार प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेच्या प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये प्रशांत खोब्रागडे यांचे नाव आहे. मात्र यादीत नावात घोळ करण्यात आला. प्रशांत ऐवजी ‘पारिशनाथ’ असे नाव प्रकाशित करण्यात आले. नावात दुरुस्ती करुन प्रस्ताव पाठविण्यात आला. नियमाप्रमाणे आॅनलाईन नोंदणीही झाली. घरकूल लवकरच मंजूर होईल, असे आश्वासन संबंधित अधिकाºयांनी दिले. पण, न्याय मिळाला नाही. खोब्रागडे यांनी पंचायत समितीमध्ये संबंधित अधिकाºयांना वारंवार भेटून विचारणा केली. मात्र आपण घरकुलासाठी पात्र आहात. आॅनलाईन यादीतून गाव वगळले गेल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर संवर्ग विकास अधिकाºयांकडे अर्ज सादर केल्यानंतर नावात दुरुस्ती करुन आॅनलाईन नोंद घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु अजूनपर्यंत नावात दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहे. गेल्या अनेक वर्षापासून लाभार्थी झोपडीत असून मजूरी करून प्रपंच चालवित आहे.प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर होवूनही प्रशासनातील अधिकाºयांच्या दिरंगाईने चुकीचे नाव दुरूस्ती करण्यात आली नाही. मंजूर झालेले घरकूल बांधण्याचे स्वप्न अजुनही साकार झाले नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खोब्रागडे यांनी केली आहे.पंतप्रधान आवास योजनेचे घरकूल मंजूर होऊनही कर्मचाºयांच्या नाकर्तेपणामुळे नावात बदल झाला आहे. त्यामुळे वंचित राहावे लागले. चुकीची दुरूस्ती करून घरकूल बांधून लाभ द्यावे.- संदीप मावलीकर,सामाजिक कार्यकर्ता, कोठारी