शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

गडचांदूर तालुका निर्मितीसाठी संघर्षयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:51 IST

शहरात अनेक उद्योग आहेत. सिमेंट कारखान्यांमुळे औद्योगिक शहर म्हणून गडचांदूरची ओळख निर्माण झाली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा : शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : शहरात अनेक उद्योग आहेत. सिमेंट कारखान्यांमुळे औद्योगिक शहर म्हणून गडचांदूरची ओळख निर्माण झाली. मात्र, तालुक्याचा दर्जा नसल्याने विकास रखडला आहे. शासनाने या शहराला तहसीलचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी बेलमपूर ते गडचांदूर-राजुरा संघर्ष यात्रा काढण्यात आली.गडचांदूरपासून पाच किमी अंतरावर असणाºया बेलमपूर येथून सकाळी नऊ वाजता संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. गडचांदूर येथे ही यात्रा पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. संघर्ष यात्रेत गडचांदूर, बैलमपूर, थुट्रा, लखमापूर, धामनगाव, हरदोना, नांदा, बिबी आणि आवारपूर येथील शेकडो नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, पत्रकार संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेलली संघर्ष यात्रा राजुरा येथे पोहोचल्यानंतर भवानी माता मंदिरमार्गेउपविभागीय कार्यालयासमोर पोहोचली. गडचांदूर तालुका झालाच पाहिजे, अशी घोषणा नागरिकांनी केली. शिष्टमंडळाने नायब तहसीलदार नक्षीने यांना निवेदन देऊन विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. संघर्ष यात्रेत भजनी मंडळही सहभागी झाले होते. संघर्ष यात्रा उपविभागीय कार्यालयात पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. आ. संजय धोटे यांनी संघर्ष समितीचे निवेदन स्वीकाले. दरम्यान, गडचांदूरला तालुका घोषीत करण्यासाठी पाठपुरावा करू. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. धोटे यांनी दिले. या संघर्ष यात्रेत समितीचे अध्यक्ष तुळशिराम भोजेकर, मुख्य संघटक उद्धव पुरी, सचिव अशोक उमरे, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, राकाँचे नितेश ताजने, न. प. उपाध्यक्षा आनंदी मोरे, नगरसेवक शरद जोगी, डॉ. के. आर. भोयर, नगरसेवक हरिभाऊ मोरे, सुरेखा गोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन भोयर, नगरसेवक सतिश उपलेंचवार, गोपाल मालपानी, ग्रा. पं. चे माजी सदस्य हफीज भाई, रमेश काकडे, विक्रम येरणे, भारिप बहुजन महासंघचे अध्यक्ष संजय उके, रिपाइंचे अध्यक्ष मदन बोरकर, प्रभाकर खाडे, रफीख शेख, नासीर खान, मुमताज अली आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.