शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दाताळा मार्गावर दगडफेकीच्या घटनांमुळे दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:35 IST

येथील दाताळा मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दुचाकी व चारचाकी वाहनांवर दगडफेक होत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देकारच्या काचा फोडल्या : १५ दिवसातील दुसरी घटना

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील दाताळा मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दुचाकी व चारचाकी वाहनांवर दगडफेक होत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. सोमवारी रात्री १०.५० वाजता जीवनज्योती कॉलनी जगन्नाथबाबानगर, दाताळा रोड येथे घरासमोर उभ्या असलेल्या एका कारवर अज्ञात इसमाने दगडफेक करून काचा फोडल्या. गेल्या १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे.सोमवारच्या रात्री १०.५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक उमेश सिताराम आडे हे एमएच २९ एआर १९८५ या क्रमांकाची सुझूकी सेंट्रो कार दाताळा मार्गावरील जीवनज्योती कॉलनी जगन्नाथ बाबानगर येथील घरासमोर उभी करून ठेवली होती. दरम्यान, काही अज्ञात इसमांनी कारवर दगडफेक करून रॉड व लाकडाने कारच्या काचा फोडल्या. याबाबत उमेश आडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.या मार्गावर यापूर्वी १६ जानेवारीला सुद्धा अशाच प्रकारे होंडा कारचा पाठलाग करून अज्ञात इसमांनी दगडफेक केली होती. या घटनेतही कारचे मोठे नुकसान झाले होते. १५ दिवसानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने या मार्गावर जाणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ राहत असल्याने लुटण्यासाठी अशा घटना घडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.