शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरवरील पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, चिमूर आदी तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान : गारपीट व वादळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, चिमूर आदी तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. याचा जिल्ह्यातील हजारो हेक्टवरील पिकांना जबर फटका बसला. उभे पीक जमिनीवर झोपले. कापून ठेवलेले पीक ओले झाले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.राजुरा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने रब्बी हंगामातील गहु, तूर, ज्वारी, मिरची, हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी गहु, तुर, हरभरा पिकांची कापणी करून ठेवली होती. मात्र, अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पिकांना सुरक्षित झाकून ठेवण्यासाठी एकच तारांबळ उडाली. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, चिंचोली, माधरा, वरोडा, कढोली, चार्ली, निर्ली परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी पाऊस झाला. अचानक पाऊस आल्याने शेतकºयांनी शेतात कापणी करून ठेवलेले पीक पूर्णत: पावसात भिजले.काही शेतकऱ्यांनी शेतात पिक गोळा करून ठेवले होते. मात्र, राजुरा तालुक्यात सुदैवाने गारपीठ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले नसले तरी रब्बी पिकांना पावसाचा चांगलाच मोठा फटका बसला आहे.यासोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावात गारपीट झाली. यामुळे रबी पिके जमिनीवर झोपली. गहू, हरभरा पीक हातून गेले. चिमूर तालुक्यातही रबी पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले.नुकसानीचे त्वरित पंचनामे करा-मुनगंटीवारजिल्हयात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही भागात नागरिकांच्या घरांचेसुध्दा नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना दिले आहेत.