शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाला बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:28 IST

जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. हा जिल्हा ‘ड्राय डे’ म्हणून ओळखण्यासाठी कठोर उपाययोजनेची गरज आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे भरावी. शिवाय वाहनासह अन्य प्रशासकीय सोईसुविधांनी या विभागाला बळकटी आणण्याची गरज आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : सामाजिक संघटनांनीही सक्रिय व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. हा जिल्हा ‘ड्राय डे’ म्हणून ओळखण्यासाठी कठोर उपाययोजनेची गरज आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे भरावी. शिवाय वाहनासह अन्य प्रशासकीय सोईसुविधांनी या विभागाला बळकटी आणण्याची गरज आहे. सद्यस्थितीत हा विभाग प्रभारींच्या खांद्यावर सुरू आहे. तस्कर व विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी या विभागाला बळकट करण्याची मागणी जिल्ह्यातील महिलांनी केली आहे. शिवाय सामाजिक संघटनांनी सक्रिय व्हावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महिलांना मोठा दिलासा दिला. दारुबंदी सोबतच काही कठोर निर्णयाची अंमलबजावणी करून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील दारूविक्री नियंत्रित आली आहे. पोलीस विभागातील काही कर्मचारी दारू विक्रेत्यांना अभय देतात, असा आरोप महिला संघटनांनी केला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दारू मिळत असल्याचे वास्तव पुढे येत आहे. काही पोलिसांच्या अपप्रवृत्तीमुळे जिल्हा व लगतच्या राज्यातून दारूतस्करी होत असल्याचे पहायला मिळत आहे. यातून दारूतस्कर व विक्रेते निर्ढावले. आता तर कर्तव्यदक्ष पोलिसांना ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. नागभीड पोलीस ठाण्याच्या छत्रपती चिडे या प्रामाणिक अधिकाºयाला मागील आठवड्यात जीव गमवावा लागला आहे. काही पोलीस व तस्करांच्या मधूर संबंधामुळेच तस्करांची हिंमत वाढली आहे. त्यांची अधिकाºयांना चिरडण्यापर्यंत मजल गेली आहे. या वास्तव्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची किती गरज आहे, हेही सिद्ध झाले. दारूबंदीसाठी एक्साईज विभाग निव्वळ कार्यालयापुरते मर्यादित दिसत असल्याने याचा विपरीत परिणाम दारूबंदीच्या यशस्वीतेवर होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. दारूबंदीनंतर एक्साईज विभागाला अद्यावत करणे गरजेचे होते. पण, सद्यातरी या विभागाचा कारभार प्रभारीवर सुरू असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात दारू परवाने नसल्याने अधिकारी या ठिकाणी येत नसल्याचे दिसून येत ेआहे. त्यातच विभागाकडे पुरेसे कर्मचारी व वाहन नसल्याने अधिकारी भाड्याच्या गाडीतून कर्तव्याचा सोपस्कार पार पाडत आहेत. दारूबंदीच्या जिल्ह्यात या विभागाला विभाग सज्ज करणे गरजेचे आहे. सोबतच दारू तस्करी रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम हे या विभागाचे असतानाही आतापर्यंत मोठी कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा फायदा काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. निव्वळ कार्यालयात बसून पांढरे कागद काळे करण्यापलीकडे विभागाचे कर्तव्य दिसत नसल्याने अधिकाºयांची भूमिका संशयाच्या भोवºयात सापडल्याचा आरोप होत आहे.सक्षम अधिकाऱ्यांची गरजराज्य शासनाने जिल्ह्यातील एक्साईज विभागात दमदार अधिकारी आणून कारवाईचा धडाका सुरू करणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात अधिकारी येत नसेल तर त्यांना सक्ती केली पाहिजे. कर्मचारी व वाहनांची व्यवस्था करून विभागाला ‘अ‍ॅक्टीव्ह’ केले तर दारूबंदी यशस्वी होण्याला पुन्हा मदत मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.