शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांविरूद्ध संघर्ष करण्याची बंजारा समाजात ताकद -संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:49 IST

संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे.

ठळक मुद्देबंजारा म्हणून एका छताखाली वैचारिक समेट झाली पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे. मात्र हा संघर्ष करताना आमच्यातील सर्व संघटनांचा वैचारिक एकोपा कायम असला पाहिजे. बंजारा म्हणून एका छताखाली वैचारिक समेट झाली पाहिजे. आपले वैचारिक एकमत झाले की, संघर्ष करायला हा समाज कायम तयार असतो. तो आपला बाणा असून समाजात ती उपजत ताकद आहे, असा आशावाद महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चंद्रपुरात रविवारी व्यक्त केला.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्थापन केलेल्या आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या विदर्भ प्रदेशच्या वतीने चंद्रपूर येथील शकुंतला फर्म, येथे आयोजित कार्यकर्ता शिबिर व राज्यस्तरीय मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या विविध क्षेत्रातील समाजबांधवांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाच्या ऐतिहासिक व सध्यास्थिती मांडली. आपला बाणा संघर्षाचा आहे. देशात ८ कोटी असणारा हा समाज महाराष्ट्रातही एक मोठी शक्ती म्हणून उभा आहे. कोणत्याही राजकीय प्रवाहात काम करीत असाल तरी जेव्हा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा प्रश्न असेल तेव्हा सर्व शकले गळून पडली पाहिजे. समाजातील नेत्यांनी, आणि विशेषत: युवकांनी संघटन शक्तीच्या बळावर पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी मंत्री राजूसिंग नाईक, आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमरसिंग तिलावत, राष्ट्रीय कार्याअध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड, विमुक्त व भटक्या जाती-जमाती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य श्रावणसिंगजी राठोड, मेहताबसिंग नाईक, अ‍ॅड.गोविंद राठोड, तुकाराम पवार, मोहन राठोड, डॉ. तुषार राठोड, अशोक चव्हाण, एन.टी. जाधव, बद्रीप्रसाद चव्हाण, पंकज पवार, भारत राठोड, अ‍ॅड जगदीश पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष टी.के.पवार, पंकज तुकाराम पवार, धुमसिंग जाधव, गोवर्धन चव्हाण, लखपती जाधव, प्राचार्य लोपचंद नामदेव राठोड यांनी केले होते. या मेळाव्याला बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.