शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण

By admin | Updated: May 26, 2016 02:01 IST

शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे.

मुंडे, महाजन मंत्रिद्वयांचे प्रतिपादन : सिंचन प्रकल्प व जलयुक्तचा आढावाचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बांधकामाधीन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी तातडीने निधी दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.बुधवारी हे दोन्ही मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच जलसंधारणाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मंत्रिद्वयांसोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, बंटी भांगडिया, संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे व कार्यकारी अभियंता राजेश सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी अधीक्षक अभियंता एम.जे. शेख यांनी जिल्ह्यातील हुमन या मोठ्या प्रकल्पासह मध्यम प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजना व बॅरेजेसची माहिती दिली. काही प्रकल्प विविध मान्यतेसाठी अडले असून काहींना निधी नसल्याने कामे रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जलसंपदा विभाग शेतकऱ्यांशी निगडीत विभाग आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही या विभागामार्फत पुरविले जाते. त्यामुळे या विभागास पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी ना. महाजन यांनी सांगितले. पाण्याचे नियोजन करताना सुक्ष्म सिंचन पध्दतीला प्राधान्य दिले जात असून पाण्याचा ३० ते ४० टक्के अपव्यय थांबविण्यासाठी कार्यक्रम आखला जात असल्याचे ते म्हणाले.जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनीही जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून प्रकल्पनिहाय माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रगतीचा आढावा जाणून घेताना जूनपर्यंत यासाठी उपलब्ध असलेला पूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जलसंधारणाची कामे करताना शोषखड्डे, नदी पुनर्जीवन आदी कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रस्त्यांचा मोठा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यावेळी जलसंपदा व जलसंधारणाच्या जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात अधिकाधिक सिंचन क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण मंत्र्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. बैठकीत पाणी गुणवत्तेबाबत निरीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. बैठकीस जलसंपदा, जलसंधारण या विभागांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)