शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:23 IST

स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात ११ जानेवारीपासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देचार दिवस भरगच्च कार्यक्रम : ब्रह्मपुरीकरांनी अनुभवला एक आगळावेगळा क्षण

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात ११ जानेवारीपासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता रविवारी शहर स्वच्छता अभियान, करियर मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिर, महानाट्य, संगीत कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, मिस व मिसेस ब्रह्मपुरी अशा विविध कार्यक्रमांने झाली.उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार तर सिनेअभिनेता असराणी, सयाजी शिंदे, अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जि.प.सदस्य डॉ. सतीश वारजुकर, फादर मॅथ्यू निरप्पेल, प्रा. राम राऊत आदी उपस्थित होते.सायंकाळी एकल नृत्य, समुह नृत्य, गीत गायन स्पर्धा त्यानंतर सिंधूताई सपकाळ यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ११ जानेवारीली रात्री ‘शिर्डी के साईबाबा’ व दुसºया दिवशी ‘सम्राट अशोका’ हे महानाट्य पार पडले. हा महोत्सव डोळ्यात साठविण्यासाठी परिसरातील नागरिकांची लक्षणीय गर्दी होती. या महोत्सवात ब्रह्मपुरीकरांचे पाय आपोआपच थिरकत होती.महोत्सवासाठी किरण वडेट्टीवार, शितल वडेट्टीवार, अ‍ॅड. राम मेश्राम, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, खेमराज तिडके, बाळू राऊत, डॉ. राजेश कांबळे, थानेश्वर कायरकर, वखार खान, नेताजी मेश्राम, अजहर शेख, यशवंत दिघोरे, मंगला लोनबले, स्मिग्धा कांबळे,डॉ.अमिर धम्मानी, डॉ. मोहन वाडेकर, मुन्ना रामटेके, मोहन बागडे, संजय ठाकूर व अन्य मंडळी तळ ठोकून होती.युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर व मॅराथॉन स्पर्धामहोत्सवामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये प्रशांत वावगे, प्रशांत परदेसी, कुलराजसिंग, प्रा. देवेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील अनेक युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मराठी अभिनेत्री राधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मॅराथान स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेमध्ये बालकांपासून, वयोवृद्धापर्यंत तर अनेक युवती सहभागी झाल्या होत्या. यावेळी कुलकर्णी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन उत्साह वाढविला. तर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता.