शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची सामाजिक पिळवणूक थांबता थांबेना

By admin | Updated: March 8, 2017 00:47 IST

महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, ....

विविध क्षेत्रात महिलांची भरारी, तरीही अवहेलनामहिला दिन विशेषप्रकाश काळे गोवरीमहिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, तिला तिच्या हक्काची जाणीव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी महिलांची समाजात आजही पिळवणूक होत आहे. यावर आज सामाजिक विचारमंथन करणे काळाची गरज ठरली आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा, समाजात सातत्याने होणारी महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्त्रि शक्तीचा जागर केला जातो. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली, तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते. समाजातच अशा असंख्य कर्तबगार महिला आहेत. त्यांना आपल्या हक्कासाठी लढतांना आयुष्यच मातीमोल करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा हक्क, अधिकार मिळतो, हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे. याचाही जागतिक महिला दिनी विचार झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतू त्यांच्या पाठीमागे लागलेला सामाजिक जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही.महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यांवर झळकत असले, तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे अधिकार हक्क का मिळत नाही? हे महिलांचे धगधगाते वास्तव आजही कायम आहे. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे आहेत. तरी दिवसेंदिवस महिलांवरी होणाऱ्या अत्याचारास वाढ झाली आहे. केवळ कायदा करून महिलांवरील होणारे अत्याचार रोखता येणार नाही. तर सामाजिक परिवर्तन करून महिलांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तरच जागतिक महिला दिन आपल्याला अभिमानाने साजरा करता येईल.आज देशभरात जागतिक महिला दिन साजरा होईलही परंतू, स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच मातीमोल झाले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवनसंघर्ष थांबणार कधी हा खरा प्रश्न सर्वासमोर आहे.न्यायासाठी संघर्षसामाजिक विकासात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. महिलांनी प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची ताकद दाखवून दिली आहे. तरीही महिलांची समाजात दिवसेंदिवस वाढत असलेली अवहेलना सामाजिक चिंतेचा विषय झाला आहे. न्यायासाठी महिलांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. न्यायाच्या प्रतिक्षेत महिलांचे आयुष्य आजही मातीमोल झाले आहे.