सीटीपीएसमधील प्रकार : ३०० कुटुंबांवर उपासमारीची पाळीचंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात लहान कामे घेवून रोजी-रोटी चालविणाऱ्या लहान कंत्राटदारांंना आता कोटेशन स्वरूपाची कामे देणे बंद करण्यात आले आहे. परिसरातील ४० संघटित कंत्राटदार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या ३०० कुटुंबाना बेरोजगारीमुळे उपासमारी सहन करावी लागत आहे. वीज कंपनीने इंक्वायरी, कोटेशन स्वरूपाची कामे काढणे बंद केले आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संघटनेचे अध्यक्ष बबलू शंभरकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी सभागृहात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी वीज कंपनीचे एम.डी. शर्मा यांनी कामे न देण्याचा काढलेला शासकीय आदेश रद्द करून सुधारित जीआर काढून ईक्वायरी, कोटेशन स्वरुपाची कामे ४० टक्के उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता आपण चंद्रपूर येथे ऊर्जामंत्र्यासोबत राज्यस्तरीय बैठक लावणार व आपल्या मागण्यांच्या न्याय निपटारा करील, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचा दौरा झाला. तरीही स्माल स्केल कॉन्ट्रक्टर असोसिएशनला चर्चेकरिता पाचारण करण्यात आले नाही. तसेच सभेची नोटीसही दिली नाही. ऊर्जामंत्री व पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करुन पुढील दौऱ्यात नोटीस देवून संघटनेला बैठकीसाठी पाचारण करण्यात यावे. तसेच ४० टक्के कोटेशन कामे देण्याची व्यवस्था सीटीपीएसला करुन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे स्माल स्केल कॉन्ट्रक्टर असोसिएशनने केली आहे. (प्रतिनिधी)बैठक बोलाविण्याची संघटनेची मागणीचंद्रपूर दौऱ्यात बैठक बोलाविण्यात यावी व चर्चेकरिता पाचारण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तथा पालकमंत्री यांच्यामार्फत ऊर्जामंत्र्यांना देण्यात आले.
लघु कंत्राटदारांना काम देणे बंद
By admin | Updated: February 22, 2017 00:51 IST