शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:56 IST

गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

ठळक मुद्देकामाचा दर्जा सुमार : ओपन स्पेसवर ठेकेदाराचा ताबा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या नेतृत्वात नागरिकांनी सोमवारी हे काम बंद पाडून आपला रोष व्यक्त केला.टिचर कॉलनीतील साई शांतीनगरातील दोन ओपनस्पेसमध्ये सदर काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून पिल्लरवरील प्लास्टर नगराध्यक्षासह नागरिकांनी हाताने काढून दाखवले. यावरून संपूर्ण कामाचा दर्जा लक्षात येतो. वॉर्डात ओपनस्पेस बेवारस अवस्थेत पडलेले पाईप, लोहा, रेती, गिट्टी, सेंट्रिंग इत्यादी ठेवल्या आहेत. त्याचा त्रास होत आहे.सात वर्षानंतरही काम अपूर्णजीवन प्राधिकरणमार्फत सुरू असलेल्या सदर कामाला २२ नोव्हेंबर २०१० साली प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. १० कोटी ३५ लाख, ४२ हजार वित्तीय आकृती बंधनानुसार १२ जानेवारी २०१२ साली नागपूर येथील कंत्राटदाराने काम सुरू केले. काम पुर्ण करण्याचा कालावधी दोन वर्ष इतका होता. मात्र सात वर्षे लोटूनही काम पूर्ण न झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात गडचांदूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.गडचांदूरच्या नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून पाणी टाकीतून काही भागात पुरवठा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्र ५ मेपर्यंत सुरु होऊन शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल. दोन्ही ओपनस्पेसला सरंक्षण भिंत करून दिली जाईल.- के.एम. शेख, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,