शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा रस्त्याचे रुंदीकरण थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:04 IST

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी अपघाताच्या घटना टळणार : हॅबिटेट कॉन्झर्व्हेशन सोसायटीला यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. हॅबिटेट कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या वतीने मागील १ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू होता.बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा व बल्लारपूर हा मार्ग वनविकास महामंडळ व मध्य चांदा वनविभागाच्या जंगलातून जातो. मागील ४ वर्षात या मार्गावर अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात वाघ, बिबट, अस्वल यांच्या अपघाती मृत्यूची नोंद वनविभागाकडे आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही वनविकास महामंडळाकडून यावर कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे अनेक वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. या रस्त्यावर अनेकदा लोकांना वाघाचे दर्शन झाले. तर कारवा-बल्लारपूर मार्गावर सुद्धा एका रानगव्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. जुनोना-पोंभुर्णा, चिचपल्ली-जुनोना-कारवा-बल्लारपूर हे संपूर्ण जंगलाने वेढलेले रस्ते आहेत. या जंगलात मांसभक्षी व तृणभक्षींची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे दुर्मिळ प्रजातीचे साप, बेडूक, पाली, सरडे, पक्षी यांचा अधिवास आहे.मात्र रात्रीच्या वेळेस चिचपल्ली-जुनोना-कारवा मार्गे बल्लारपूर व पोंभुर्णा-जुनोना मार्गे चंद्रपूर या रस्त्यावर अवैध वाहतूक वाढल्याने अनेक अपघात घडत होते. जुनोनापासून अवघ्या २ किमी अंतरावर काही दिवसांपुर्वी अस्वलीला जीव गेला होता. अपघातात वन्यजीवांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना या सार्वजनिक बांधकाम विभागाला संस्थेच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आल्या होत्या. यावर गंभीरपणे लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरण न करण्याची मागणी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली होती.गतिरोधक उभारून अवैध वाहतूक रोखण्याची मागणीहॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने केलेल्या मागणीची दखल घेत बांधकाम विभागाने रूंदीकरणाचे काम थांबविले आहे. गरजेच्या ठिकाणी गतीरोधक उभारण्यात येणार आहे. वनविकास महामंडळाला चिचपल्ली-जुनोना मार्गावर सायंकाळी ६ वाजतानंतर वाहतूक बंद करण्याची मागणी केली असून अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.