नागभीड पोलिसांनी माहिती मिळताच मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे.
नरेंद्र जेजेराम रामटेके असे आरोपीचे नाव आहे. त्याने पांजरेपार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले असल्याची माहिती आहे. अशातच त्याने घरी दारूचा साठा जमा करून ठेवला होता.
नरेंद्रच्या घरी दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती नागभीड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पांजरेपार येथे गेले असता घर कुलूपबंद होते. पंचासमक्ष कुलूप तोडून घराची झडती घेतली असता घराच्या एका भागात देशी दारूच्या ९० मिलीच्या १९४ बॉटल आढळून आल्या. या दारूची किंमत १९ हजार ४०० रुपये आहे. नागभीड पोलिसांनी कलम ६५ ई ( मदाका) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे. अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत.