शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन

By admin | Updated: March 4, 2016 01:04 IST

एफडीसीएम लिमीटेडच्या कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन स्थानिक चंद्रपूर वनविकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या आॅडीटोरीयम हॉलमध्ये ...

चंद्रपुरात आयोजन : राज्यातील एक हजारांवर कर्मचाऱ्यांचा सहभागचंद्रपूर : एफडीसीएम लिमीटेडच्या कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन स्थानिक चंद्रपूर वनविकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या आॅडीटोरीयम हॉलमध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून १ हजारपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते.संघटनेचे उपाध्यक्ष आर.एम. मरस्कोल्हे, सचिव आर.पी. बल्लया, रोटे विभागीय अध्यक्ष भंडारा, भावे विभागीय अध्यक्ष मध्य चांदा यांनी सभेत कर्मचाऱ्यांच्या अडचणीवर मनोगत व्यक्त करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मुख्य २० प्रश्नांबाबतचे निवेदन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सादर करून प्रास्ताविक भाषणात सर्व मुद्दे व मुद्याच्या अनुषंगाने सर्व माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. सर्व प्रश्न निकाली काढावे, अशी संघटनेतर्फे विनंती करण्यात आली.एफडीसीएम लिमीटेडतर्फे मुख्य महाव्यवस्थापक साईप्रकाश यांनी संघटनेने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आवश्यक ती कार्यवाही करून प्रश्न निकाली काढणेबाबत आश्वासन दिले. तसेच महाव्यवस्थापक एम.एस. डोळे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विस्तृत तपशिल स्वरूपात पुस्तक तयार करून १ महिन्यांपर्यंत संघटनेकडे व मंत्रालयात सादर करावे. महामंडळाच्या स्तरावरील प्रश्न निकाली काढावेत व मंत्रालयस्तरावरील प्रश्न माझ्याकडे पाठविण्यात यावे, असे निर्देश एफडीसीएमतर्फे उपस्थित असलेले साईप्रकाश यांना दिलेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.संघटनेचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचा सहानुभुतीपूर्वक विचार करून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली. कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काबाबत एकसंघ राहून लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ‘एफडीसीएम बचाओ, एफडीसीएम बढाओ’ हा नारा दिला.अधिवेशनामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस अशोक तुंगीडवार, उपाध्यक्ष एस.पी. बोबडे, आर.के. वाघमारे, आर.एम. मरस्कोल्हे, एम.पी. जोशी, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, सचिव आर.पी. बल्लया, पवन दहागावकर, आर.एफ. लोखंडे, आर.के. टिकले, पी.पी. खुने, डी.जी. मडावी, शेखशम्मी अ. गफूर, एम.एम. ठाकरे, अरविंद सावकारे व सोनी पंधरे उपस्थित होते.तसेच एफडीसीएम लिमीटेडतर्फे मुख्य महाव्यवस्थापक साईप्रकाश (भावसे), दक्षिण चंद्रपूर प्रदेशचे महाव्यवस्थापक एम.एम. न्युग्ली, उत्तर चंद्रपूरचे महाव्यवस्थापक एस.एस. डोळे, पश्चिम चांदाचे विभागीय व्यवस्थापक एस.बी. पाटील, विभागीय व्यवस्थापक नौकरकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)