शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय समिती एकाच दिवसात परतली

By admin | Updated: February 2, 2017 00:32 IST

स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यस्तरीय तपासणी समितीने आपला नियोजित चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा दोन दिवसांचा दौरा सहलीसारखा एकाच दिवशी आटोपला असून...

घाईगर्दीत केली पाहणी : दोन दिवसांचा होता नियोजित दौराचंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यस्तरीय तपासणी समितीने आपला नियोजित चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा दोन दिवसांचा दौरा सहलीसारखा एकाच दिवशी आटोपला असून या दौऱ्यादरम्यान समितीने घाईगर्दीत हागणदारीमुक्त परिसर, सार्वजनिक शौचालये तसेच शाळांची पाहणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर या अभियानातंर्गत चंद्रपूर शहर स्वच्छ आणि हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. मार्च २०१७ अखेर चंद्रपूर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. या अभियानातंर्गत महानगरपालिकेने काय प्रगती केली याची पाहणी करण्यासाठी गेल्या महिन्यात केंद्रीय स्वच्छता समितीने दौरा केला होता. आता राज्यस्तरीय समितीने दौरा केला. या समितीत नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्धीकी, नागपूर विभाग आयुक्त कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक संचालक (नगरपालिका प्रशासन) कैलास झंवर, पत्रकार कार्तिक लोखंडे, वर्धा येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे किशोर भोयर आणि प्रवीण तडस यांचा समावेश आहे.ही समिती सोमवारी रात्री चंद्रपुरात दाखल झाली. समितीचा ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा नियोजित दौरा होता. मात्र, सोमवारी रात्री आलेल्या समितीने मंगळवारी दिवसभर सहलीप्रमाणे शहरातील काही भागांना भेटी दिल्या. बिनबा गेटच्या बाहेरील भाग, विठ्ठल मंदिर परिसरातील खिडकी, झरपट नदी, जटपुरा गेट, रामाळा तलाव, बाबुपेठ रेल्वे लाईन आणि जलनगरमधील हागणदारीमुक्त परिसराची पाहणी केली. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या गौतमनगर, जटपुरा गेट, महाकाली मंदिर आणि बुरडकर मोहल्ल्यातील सार्वजनिक शौचालयाचीसुद्धा पाहणी केली. तुकूममधील मातोश्री विद्यालय आणि महानगरपालिकेच्या दोन शाळांना भेटी देवून तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तत्पूर्वी सकाळी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत समितीची बैठक झाली. या बैठकीत मनपा प्रशासनाने साफसफाई आणि हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या कामाची प्रात्याक्षिके दाखविली.स्वच्छ भारत अभियानाच्या केंद्रीय समितीने प्रात्यक्षिकावर भर न देता दोन दिवस सर्व भागांचा दौरा करून गुणांकन केले. मात्र राज्यस्तरीय तपासणी समितीने प्रत्यक्ष पाहणीवर अधिक भर न देता प्रात्यक्षिक पाहून समाधान मानले. मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दौरा आटोपून समितीने रात्रीचा मुक्काम बल्लारपुरात ठोकला. बुधवारी भल्या सकाळी समिती नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या दौऱ्यादरम्यान समितीने कोणकोणत्या भागांना भेटी दिल्या, तसेच काय अवलोकन केले, याबाबत समिती सदस्य काहीही बोलायला तयार नाही. सरकारला गोपनीय अहवाल सादर करायचा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)