शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचारी रस्त्यावर

By admin | Updated: September 3, 2015 00:34 IST

शासनाकडे अनेकदा मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी करूनही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. शासनाच्या या उदासीनतेमुळे कामगार व राज्य कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

सुमारे पाच हजार कर्मचारी सहभागी : प्रलंबित मागण्या पूर्ण करांचंद्रपूर : शासनाकडे अनेकदा मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी करूनही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. शासनाच्या या उदासीनतेमुळे कामगार व राज्य कर्मचारी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बुधवारी देशव्यापी संपाला अनुसरून विदर्भ मजदूर काँग्रेससह विविध राज्य कर्मचारी संघटनांनी शासनाच्या या धोरणाविरोधात चंद्रपुरात मोर्चा काढला. सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या या मोर्चातील घोषणांमुळे चंद्रपूर दुमदुमले. शहरातील प्रमुख रस्त्यावरून हा मोर्चा गेल्याने शहरातील वाहतूकही प्रभावित झाली.कामगारांना किमान वेतन १५ हजार रुपये मिळाले पाहिजे, अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण थांबविणे, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे, कामगार कायद्यात विरोधी तरतुदी करू नये, शेतकऱ्यांवर अन्याय करणारा जमीन अधिग्रहण कायदा आणू नये, बेरोजगारी नष्ट करणे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न चर्चेद्वारे मार्गी लावणे, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करणे आदी मागण्यांसाठी या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र तथा राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले. विदर्भ मजदूर काँग्रेसच्या मागण्यांमध्ये राशन पध्दती पुन्हा सुरू करावी, श्रम कायद्यातील कामगारविरोधी परिवर्तन रद्द करा, वाढत्या बेरोजगारीवर नियंत्रण आणावे, सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.दुपारी १२ वाजतापासून विविध संघटनांनी विविध जागेवरून मोर्चाला प्रारंभ केला. बहुतेक संघटनांनी गांधी चौकातून मोर्चाची सुरूवात केली. हा मोर्चा जयंत टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आझाद बागेतून काही संघटना मोर्चात सहभागी झाल्या. काही संघटनांनी कस्तुरबा मार्गाने मोर्चा काढला. हाही मोर्चा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सर्व संघटनामिळून सुमारे पाच हजार कर्मचारी व कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. महात्मा गांधी मार्ग आणि कस्तुरबा मार्गाने मोर्चा निघाल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा पोहचल्यानंतर प्रत्येक संघटनांनी आपले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)सहभागी संघटनामहसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, वित्त व लेखा गट ब संघटना, कोषागार कर्मचारी, वनविभाग कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी, भूविज्ञान आणि खनिकर्म कर्मचारी, उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी, मलेरिया कर्मचारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी, स्थानिक निधी कर्मचारी, विक्रीकर कर्मचारी, भूमी अभिलेख कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कास्ट्राईब कर्मचारी, आदिवासी विभाग कर्मचारी, प्राथमिक शिक्षक कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय कर्मचारी, नर्सेस कर्मचारी, समाज कल्याण कर्मचारी व विदर्भ मजदूर काँग्रेस संघटना मोर्चात सहभागी झाले होते.