सुधीर मुनगंटीवार : इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह नूतनीकरणाचे लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूरच्या सांस्कृतिक चळवळीने, नाट्य निर्मितीने महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहाच्या अत्याधुनिक सुविधा नव्या युगाच्या स्पर्धेत वेगाने पुढे जाण्यासाठी पूरक ठरतील. चंद्रपूरचा ठसा कला क्षेत्रात ठसठसीतपणे उमटवेल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी केले. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सभागृहाच्या नुतनीकरणासोबतच भारतरत्न लता मंगेशकर कलादालनाचे लोकार्पणसुद्धा यावेळी झाले. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ अशोकसिंह ठाकूर यांनी या ठिकाणी नाणेसंग्रालय उभारले आहे. त्यांच्या योगदानाचा गौरवोल्लेख ना. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात केला. या कलादालनामध्ये प्राचीण काळातील नाण्यांचा संग्रह असून देश-विदेशातील नाणे, मुद्रा प्रमुख आकर्षण आहे. अध्यक्षस्थानी आमदार नाना शामकुळे होते. मंचावर आ. विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धानोरकर, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, नागपूर विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता रविंद्र आकुलवार, मुख्य अभियंता (प्रादेशिक विभाग) उल्हास देबडकर, कार्यकारी अभियंता उदय भोयर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर अनिल फुलझेले उपस्थित होते. ना. मुनगंटीवार यांनी चांदा ते बांदा असणाऱ्या राज्यात चांदा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहावे, ही अपेक्षा केली. राज्याच्या उर्जेचा स्त्रोस्त्र वीजेमार्फत आम्ही आहोत. सर्वाधिक जंगल क्षेत्राचे प्रतिनिधित्व आम्ही करतो. उद्या नाट्य क्षेत्रातील सर्वच पुरस्कार चंद्रपूरला मिळाले, तर आश्चर्य वाटणार नाही. मूल येथे नाट्यगृह आहे. झाडीपट्टीच्या नाट्य चळवळीचे केंद्रस्थान असणाऱ्या वडसादेसाईगंज येथे नाट्यगृह उभारले जाईल. आ. विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपूरी व आ. सुरेश धानोरकर यांच्याही मतदार संघात नाट्यगृह उभारले जाईल. नाट्यचळवळीला गती आणण्याचा हा प्रयत्न असून त्यासाठीच या मुख्य नाट्यगृहाला आधुनिक स्वरुप दिल्याचे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हयाच्या विविध विकासाचा आढावा मांडला. प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभागृहाचे लोकार्पण करताना ना. सुधीर मुनगंटीवार, बाजुला आ. श्यामकुळे, देवराव भोंगळे, अंजली घोटेकर, डावीकडून महेश मेंढे, आ. धानोरकर व आ. वडेट्टीवार.
अत्याधुनिक सुविधेने कला क्षेत्रात चंद्रपूरचा ठसा उमटेल
By admin | Updated: July 15, 2017 01:42 IST