शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरी येथे वनोद्यान निर्मितीला प्रारंभ

By admin | Updated: June 23, 2016 00:41 IST

जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिंपरी तालुका हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वतीने आजवर वनसंपदेसह, ...

युवकांच्या प्रयत्नांना यश : पाठपुराव्याचे फलितगोंडपिंपरी : जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिंपरी तालुका हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वतीने आजवर वनसंपदेसह, वन्यजीव सुरक्षेबाबत नागरिकांशी मेळ घालण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले नाही. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वनोद्यान निर्मितीबाबत सतत पाठपुरावा करणाऱ्या युवकांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. येथे वनोधान निर्मितीच्या कामास प्रारंभ झाला आहे.ग्राम खेड्यातील युवकांना वनसंपदा व वन्यजीव सुरक्षा काळाची गरज, पर्यावरणविषयी जाण तसेच माहिती मिळावी, या हेतुने येथील युवा कार्यकर्ता राकेश पून तसेच सहकाऱ्यांनी गोंडपिंपरी येथे वनोद्यान निर्मितीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांकडे मागणी रेटून धरली. या संदर्भात युवकांनी पत्र मोहिम व निवेदने देऊन वनोद्यान निर्मितीबाबत सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नास अखेर यश आले असून स्थानिक शहरातून मूल शहराकडे जाणाऱ्या मार्गालगत उत्तमराव पाटील वनोद्यान निर्मिती कामास प्रारंभ झाला आहे. तत्पूर्वी ना. मुनगंटीवार यांनी युवकांच्या मागणीनुसार वनोद्यान निर्मितीबाबत त्वरित मंजुरी दिली होती. मात्र वनोद्यान निर्मिती स्थळाबाबत वनविभाग व काही स्थानिक नेते यांंच्यात स्थळाबाबत ताळमेळ न जुळल्याने वनोद्यान निर्मिती कार्यास विलंब झाला होता. आता मात्र सामाजिक वनीकरण विभागामार्फत तसेच वनविभाग व स्थानिक पदाधिकारी यांच्या समन्वय घडून वनोद्यान निर्मितीची जागा पक्की करण्यात आल्यावर गोंडपिंपरी- खराळपेठ या मार्गावर वनोद्यान निर्मितीचे कार्य झपाट्याने सुरू आहे. गोंडपिंपरी तालुक्याला नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र वनोद्यानमुळे निश्चितच या तालुक्याला लाभ मिळणार असून युवकांच्या मागणीचे फलित असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)