शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नवे प्रवेशद्वार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:29 IST

मूल तालुक्यातील सोमनाथ गावाकडील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक व वनविभागाने यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देपर्यटकांची मागणी : सोमनाथ प्रवेशद्वारातून पर्यटन विकास

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा : मूल तालुक्यातील सोमनाथ गावाकडील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक व वनविभागाने यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मूल शहरापासून केवळ ९ किमी अंतरावर असलेल्या सोमनाथ परिसराला निसर्गाची देणगी लाभली आहे. वर्षभरातील १० महिने येथे पर्यटकांची मांदियाळी असते. याच परिसरात हेमाडपंथी पुरातन मंदिर असून बाजूला वाहणारा धबधबा आहे. हिरव्याकंच वनराईने पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या परिसरातील डोंगर रांगातून वर्षभर वाहणाऱ्या झºयामुळे पाखरांची किलबिल सुरू असते. या परिसरात वन्यजीवांचे सहजपणे दर्शन होते. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चामोर्शी व गोंडपिपरी या शहरांना जोडणारे मूल शहर हे केंद्रस्थानी आहे. त्यातही दक्षिण-पूर्व मार्गाला जोडणारे मारोडा रेल्वेस्थानक केवळ पाच किमी अंतरावर आहे. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी उभारलेल्या सोमनाथ प्रकल्पाला देशभरात प्रसिद्धी मिळाली. देश-विदेशातून अभ्यासक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतात. सोमनाथ येथून डोणी गावाकडे जाण्यासाठी अनेक वर्षांपासून पाऊलवाटेचा उपयोग केला जातो. या परिसरातील नागरिक याच मार्गाने जंगलात जातात. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून डोनी गावाकडे जाण्याचा हा महत्त्वाचा व सुरक्षित मार्ग होता. एकदा ही टेकडी चढली की व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सोमनाथ प्रकल्पाकडे जाताना दोन किमी अंतराच्या परिघातच वाघ अथवा अन्य वन्यजीवांचे दर्शन सहजपणे घेता येते.काही वर्षांपूर्वी सोमनाथ येथे रिसोर्ट बांधण्यात आले. शिवाय, रस्ते बांधकामही पूर्ण झाले आहेत. पाण्याची टंचाई नाही. हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. वर्षेभर हजारो भाविक सोमनाथ येथे येतात. पर्यटकांची वर्दळ सुरू असूनही ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी प्रवेशद्वार सुरू करण्यात आले नाही. ताडोबा संरक्षित जंगलात व्याघ्र दर्शनासाठी या मार्गातून प्रवेश दिल्यास निसर्गरम्य सोमनाथ, सोमनाथ सेवा प्रकल्प आणि व्याघ्रदर्शन असा तिहेरी फायदा पर्यटकांना होऊ शकतो. शिवाय बफर झोन क्षेत्रातील युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. वन हा वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची चळवळ गतिमान होवून महसूल मिळू शकतो. त्यामुळे सोमनाथकडून प्रवेशद्वार सुरू करावा, अशी मागणी पर्यटकांनी मागणी आहे.स्वयंरोजगाराच्या संधी वाढतीलताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे देशभरातील पर्यटक जिल्ह्यात येतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात सोमनाथ हे स्थळदेखील आकर्षक आहे. व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी सोमनाथकडील प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटकांची संख्या पुन्हा वाढेल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वार्षिक उत्पन्नात भर पडून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, वन विभागाने यासंदर्भात अजूनही सकारात्मक विचार केला नाही. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.