शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

करारनाम्यानंतरच बांधकाम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:42 IST

तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने शनिवारी ते बंद पाडण्यात आले होते.

ठळक मुद्देटॉवर प्रकरण : शेतकºयांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने शनिवारी ते बंद पाडण्यात आले होते. दरम्यान सोमवारी आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना घेराव घालून दोन दिवसांत करारनामा करा आणि त्यानंतरच बांधकामासाठी शेतात पाय ठेवा, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.नागरी येथील सबस्टेशनला वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतात टॉवर उभारले जात होते. मात्र, पॉवर ग्रीडने यासंदर्भात करारनामा केला नाही. प्रतिकार केल्यास शेतकºयांना दमदाटी केली जात होती. आज उपविभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामूळे नागरी येथील उपकेंद्राचे काम बंद करण्यात आले. संतप्त शेतकºयांनी टॉवर कंपन्यांचा निषेध करून करारनामा करण्याची मागणी केली.वर्धा ते नागरी येथे ४०० केव्ही टॉवर उभारली. शिवाय, नागरी ते परळी ७६५ केव्ही टॉवरची उभारणी केली जात आहे. वर्धा ते नागरी मार्गावरील शेतात टॉवर उभारणी करणाºया शेतकºयांना प्रति टॉवर १५ लाख रूपये तर नागरी परळी मार्गावरील टॉवरखाली आलेल्या शेताला २५ लाख रूपये प्रति टॉवर मोबइला द्यावा, टॉवर लाईनमुळे अशंत: बाधित झालेल्या शेतकºयांनाही मोबदला देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांनी केली. वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी आमदार बाळू धानोरकर, पॉवर ग्रीड कंपनीने अधिकारी, तहसीलदार सचिन गोसाई, कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थिीत होते. शेतकºयांचा वतीने आमदार बाळू धानोरकर यांनी भूिमका मांडली. शेतकºयांचे नुकसान होऊ नये, यासाठी पॉवर ग्रीड कंपनीच्या अधिकाºयांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी आ.बाळू धानोरकर यांनी या बैठकीत केली.-अन्यथा गुरूवारी आंदोलनशेतकºयांशी करारनामा न करता टॉवर उभारल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावर मार्ग काढण्यासाठी उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली. मात्र, पॉवरग्रीड कंपनीने तोडगा काढला नाही. त्यामुळे गुरूवारी वरोरा येथील रत्नमाला चौकात रास्ता रोको आंदोलन आणि जाम तसेच नागरी येथील उपकेंद्रात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.