शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

चंद्रपूर श्वेतांबर जैन मंदिराच्या शताधिक महोत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: November 19, 2015 01:30 IST

चंद्रपूर शहरातील श्री शांतिनाथ जिनालय श्री जैन श्वेतांबर मंदिराला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला.

विविध कार्यक्रमांचे आयोजन : चंद्रपूर शहरातून आज निघणार शोभायात्राचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील श्री शांतिनाथ जिनालय श्री जैन श्वेतांबर मंदिराला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला. त्यामुळे यावर्षी शताधिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या पंचदिवसीय महोत्सवाचा शुभारंभ विचक्षण व्याख्यान मालाप्रसंगी जैन साध्वी श्री हेमप्रज्ञाजी महाराजांच्या मंगलमय उपस्थित सकल जैन समाजाचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया आणि श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष निर्दोषकुमार पुगलिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन करण्यात आले.या पंचदिवशीय शताधिक महोत्सवाप्रसंगी दररोज सकाळी ९ ते १० देशातील मान्यवर अभ्यासू वक्त्यांचे प्रवचन, दुपारी जैन मंदिरात शांतीनाथ प्रभूची पूजा, अर्चना, अभिषेक आणि संध्याकाळी भक्ती संगीताचे आयोजन करण्यात आले आहे.१९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात येईल. विचक्षण व्याख्यान मालेचे प्रथम पुष्प साध्वजी श्री हेमप्रज्ञाजी महाराजांनी गुंफले. जैन धर्माच्या साध्वी श्री विचक्षण श्रीजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही विचक्षण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. विचक्षण महाराजांच्या जीवनकार्याबद्दल साध्वीजीनी प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर मानवी कल्याणासाठी जीवन जगतात, त्यांच्या हृदयात करुणा, प्रेम, दया, आंतप्रोत भरलेली असते. ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता असून मुखातून नेहमी प्रभूनाम स्त्रवीत होत असतो. अशा संत श्रेणीतील विचक्षणजी होत्या, असे त्या म्हणाल्या.बाल काळापासूनच त्यांना वैराग्य भावना प्राप्त झाली. लहान वयातच वडिलाचे निधन झाले. आजोबांची लाडकी नात पण मनात महान वैराग्य उदित झाले. वयाच्या केवळ ११ व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली आणि संपूर्ण जीवन महावीर स्वामीची आराधना आणि जैन धर्माच्या सेवेत समर्पित केले, असे सांगितले. साध्वीजी श्री हेमप्रज्ञाजी महाराज यांचा चातुर्मास चंद्रपूर येथे सुरू असून त्यांच्या सोबत त्यांच्या शिष्या पूज्य श्री आत्मदर्शनाजी पू.श्री आराधना श्री जी आणि पू.श्री क्षमानिधी श्रीजी महाराज ही उपस्थित आहेत.विचक्षण व्याख्यानमाला २२ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी ९ ते १० पर्यंत श्री जैन भवन येथे होईल. १९ ला सकाळी साध्वीजीचे प्रवचन झाल्यानंतर लगेच शोभायात्रा प्रारंभ होईल. या शोभायात्रेत शांती भगवान यांची पालखी, जबलपूरची शहनाई, तुतारी, लुधियाना पंजाबचा पाईप बॅन्ड, राजनांदगावचा बॅन्ड, नेरची भजन मंडळी, मंगल कलशधारी महिला, महावीर स्वामींच्या जीवनावर आधारीत विविध दृष्ये राहणार आहेत.या शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे तसेच सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्याची विनंती सकल जैन समाजाचे अध्यक्ष नरेश पुगलिया, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष निर्दोष पुगलिया, स्थानवासी श्री संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, दिगंबर चंद्रप्रभ मंदिर तुकूमचे अध्यक्ष डॉ. महावीर सोईतकर, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चंद्रपूरचे अध्यक्ष सुभाष जैन, राजकुमार पुगलिया, योगेश पुगलिया, जीतदत्त सुरी, संदीप बांठीया, रोहित पुगलिया, राजू लोढा, राहुल पुगलिया, नीरज खजांची, अभिषेक कास्टीया, गौरव कोचर, गौतम कोठारी आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)