शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २३ गावात त्वरित बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:12 IST

सिंदेवाही तालुक्यातील २३ गावात बस जात नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गावात तातडीने बस सुरु करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पारोमिता गोस्वामी यांच्या मागणीनंतर लगेच अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील २३ गावात बस जात नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गावात तातडीने बस सुरु करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. याची दखल घेत त्या २३ गावात त्वरीत बस सुरु करावी, बससासाठी रस्ते नसतील तर त्वरीत रस्त्यांचे बांधकाम करावे, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाºयांना दिले.जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सावली तालुक्यात वसतिगृहांचा प्रश्न मागील २०११ पासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. वसतिगृहाअभावी मुले बाहेर तालुक्यात जात आहे. तर अनेकांनी शाळा सोडल्या आहेत. तर काही जीव धोक्यात घालून पायी सायकलने जात आहेत. सावली व पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी मुले आणि मुली यांचे वसतिगृह बांधावे, नांदगांव येथील आदिवासी मजूर गुरूदास सोमा सिडाम यांचे हात खासगी डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे खराब झाले. यामुळे या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाने या मजुरांला भरपायी द्यावी, सावली तालुक्यातील चेक मानकापूर येथील आदिवासी शेतमजूर ऋषी मारोती मडावी हा कीटकनाशकांच्या फवारणीत मृत पावला. कीटकनाशकांच्या फवारणीत मृत व्यक्तीला भरपायी देण्याची तरतूद असतानाही मागील चार महिन्यांपासून मदत देण्यात आली नाही. ती मदत तातडीने द्यावी, दारुबंदीची कठोर अमंलबजावणी करावी, अशी मागणी केली.यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सावली व पोंभुर्णा येथे वसतिगृहासाठी जानेवारीपर्यंत मंजूरी मिळवून घेणार, असे आश्वासन दिले. तसेच मृत शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, घनश्याम मेश्राम आदी उपस्थित होते.