शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात शुक्रवारपासून होणार बांबू तंत्रज्ञान अभ्यासक्रमाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:23 IST

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत बांबू विषयक पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत बांबू विषयक पदविका अभ्यासक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत बांबू विषयक पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन व बांबू वस्तुचे प्रदर्शनाचे उद्घाटन २९ सप्टेंबरला वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात दुपारी १ वाजता होणाºया या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये बांबूपासून मूल्य जोडणी करुन विविध वस्तू बनविण्याचे काम सुरु आहे. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्रात प्रथमच या संशोधन केंद्रामार्फत सुरु करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम २ वर्ष कालावधीचा असून महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ यांच्याशी संलग्नीत असणार आहे. या संशोधन केंद्राचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील बांबूवर आधारित बुरड व इतर समाजातील लोकांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध देण्यास मोठा हातभार लागणार आहे.चंद्रपूरचे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचपल्ली येथे लवकरच उभे राहणार आहे. सध्या रेंजर कॉलेजमध्ये कार्यशाळेत या संदर्भातील कार्यशाळा सुरु आहे. या प्रशिक्षण केंद्रातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी केली आहे.या बांबू प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना काम मिळणार आहे.