शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्त गाव संकल्पनेला हरताळ

By admin | Updated: November 18, 2014 22:52 IST

शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवित आहे. कोणतीही योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबविली तर त्याचा लाभ जनतेला होतो. मात्र अनेक ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांच्या

हरदोना : शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवित आहे. कोणतीही योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबविली तर त्याचा लाभ जनतेला होतो. मात्र अनेक ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे हागणदारी मुक्त गाव संकल्पनेला ग्रामपंचायतींनीच हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे.राज्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावा यासाठी शासनाने हागणदारी मुक्त गावाची संकल्पना पुढे करीत योजनेला धडाक्यात प्रारंभ केला होता. शासनाने ही योजना यशस्वी करण्यासाठी हागणदारीमुक्त गावाला पुरस्कार देण्याची घोषणा केली. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याने ही योजना आता नावापुरतीच उरली आहे.शासकीय अधिकारी कर्तव्यदक्ष नसले तर सरकारी योजनांची कशी वाट लागते याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. राजुरा तालुक्यातील गावांना भेट दिल्यानंतर गावाच्या प्रवेशद्वारापासून घाणीने माखलेले रस्ते पाहून नाकावर रूमाल धरल्याशिवाय पर्याय नसतो. गावातील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने व ग्रामपंचायतीने ही योजना गावकऱ्यांच्या सहकार्यातून यशस्वीपणे न राबविल्याने या योजनेला ग्रामपंचायतींनीच हरताळ फासले आहे. शासनाची योजना केवळ कागदोपत्रीच राबवून कागदावरच गावाचा विकास करायचा. मात्र प्रत्यक्षात गावात चित्र बघितले तर वास्तविकता वेगळीच असेच चित्र अनेक गावात आहे. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना यशस्वी करताना ग्रामपंचायतींनी गावकऱ्यांना त्या योजनेची पुरेपूर माहिती व पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र अनेक ग्रामपंचायतीचे कर्मचारी याला बगल देत माहिती देण्याचे टाळत असतात. त्यामुळे गावकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही.शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचविणाऱ्या व ग्रामस्तरावर मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींनाच अखेरची घरघर लागली असून शासकीय योजना कागदोपत्री राबवून धन्यता मानण्यात पटाईत असलेले शासकीय कर्मचारीच चांगल्या योजनेला ग्रहण लावत आहेत. हागणदारी मुक्त गावाची संकल्पना आता धूसर झाली असून ग्रामपंचायतींनीच या योजनेला हरताळ फासला आहे. (वार्ताहर)