शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

महिलांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: February 10, 2016 00:59 IST

गुरुदेव सेवा मंडळाच्या सार्वजनिक प्रार्थना मंदिराकरिता जागा देण्याकरिता २६ जानेवारीला महिलांच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला.

घोडपेठ ग्रामपंचायत : प्रार्थना मंदिरासाठी जागा देण्याची मागणीघोडपेठ : गुरुदेव सेवा मंडळाच्या सार्वजनिक प्रार्थना मंदिराकरिता जागा देण्याकरिता २६ जानेवारीला महिलांच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला. तो ठराव ग्रामसभेमध्येही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मात्र गावातील महिलांना ठरावाचे पत्र देण्यात आले नाही. ठरावाच्या पत्राच्या मागणीसाठी मंगळवारी घोडपेठ येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी १० वाजतापासून ठिय्या आंदोलन सुरू केले.घोडपेठ येथील मुख्य सर्व्हे क्र. ३७२ नुसार १०० व १००/१ या रिकाम्या प्लॉटवर अनेक वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिराकरिता गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमीत केले आहे. २६ जानेवारीला महिलांच्या विशेष ग्रामसभेमध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिराकरिता जागा देण्यासाठी ठराव घेण्यात आला, तो मंजूरही झाला. हा ठराव सार्वजनिक ग्रामसभेमध्येही घेण्यात आला. मात्र ठरावाच्या प्रती देण्यात आल्या नाही. या ठरावाच्या प्रतीच्या मागणीसाठी घोडपेठ येथील महिलांचे सोमवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले.२६ जानेवारीपासून ग्रामसेवक विलास भिवगडे महिलांना ठरावाची प्रत देण्यास दिरंगाई करीत आहे. ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार महिला सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाल्या. मात्र सकाळपासून ग्रामसेवक आलाच नाही. सायंकाळी ७ वाजता ग्रामसेवकाने स्वत:चा भ्रमणध्वनी बंद केला. यावेळी गावकऱ्यांनी शासनाच्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. सायंकाळी साडेसात वाजता पंचायत समिती भद्रावतीचे विस्तार अधिकारी बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले. यावेळी भाजपाचे तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, सेवकराम मिलमिले, वैशाली डुडुरे, माजी उपसभापती यशवंत वाघ, पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर रंगारी, उपसरपंच विनोद घुगुल, विनोद सातपुते उपस्थित होते. ग्रामसेवकाने ठरावाची प्रत देण्यात यावी एवढी साधी नागरिकांची मागणी आहे. मात्र ग्रामसेवक कार्यालयात न फिरकल्याने त्याचे ठराव प्रोसिडिंग बुकात लिहिला नसल्याचा नागरिकांचा अंदाज आहे. त्यामुळे दोषी ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या विषयावर अद्यापही तोडगा निघाला नव्हता. (वार्ताहर)