शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:06 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचा १७ आॅक्टोबरपासून संप सुरू आहे. सतत चार दिवस जिल्ह्यातील सुमारे सव्वातीनशे बसेस डेपोतच थांबल्या असून हजारो बसफेºया बंद आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : जिल्ह्यातील सुमारे सव्वातीनशे बसेसची चाके थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचा १७ आॅक्टोबरपासून संप सुरू आहे. सतत चार दिवस जिल्ह्यातील सुमारे सव्वातीनशे बसेस डेपोतच थांबल्या असून हजारो बसफेºया बंद आहेत. यामुळे महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसला आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीत प्रवासी वाहतूक कोलमडली असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण पाच एसटी डेपो आहेत. यातील चंद्रपूर डेपोत ९७ बसेस, वरोरा डेपोत ३७ बसेस, चिमूर डेपोत ४२, राजुरा डेपोत ६७ तर ब्रह्मपुरी डेपोत ६० बसेस आहेत. या सर्व बसेसच्या हजारो बसफेºया जिल्ह्यातील गावागावात सुरू राहतात. मात्र या सर्वच बसेच सध्या संपामुळे डेपोतच थांबल्या आहेत. एसटी महामंडळातीलच एका अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर डेपोचे दररोजचे उत्पन्न जवळपास ११ लाख रुपये, वरोरा डेपोचे चार ते पाच लाख, चिमूर डेपोचे पाच ते सात लाख, राजुरा डेपोचे पाच ते सात लाख आणि ब्रह्मपुरी डेपोचे चार ते सहा लाख रुपये उत्पन्न होते. मात्र जिल्ह्यातील सुमारे अकराशे कर्मचारी संपावर असल्याने व चार दिवस सर्वच बसफेºया बंद असल्याने एसटी महामंडळाला जिल्ह्यातून कोट्यवधींचा फटका बसला आहे.दिवाळीच्या दिवसात मोठ्या संख्येने नागरिकांना प्रवास करावा लागतो. बसस्थानकावर या दिवसात तोबा गर्दी असते. मात्र ऐन दिवाळीच्या चार दिवसातच बसफेºया बंद असल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात प्रवाशी वाहनांची मनमानी सुरू असून तिकीटापेक्षा दुप्पट पैसे घेतल्यानंतर प्रवाशांना नेले जात आहे.प्रवाशांनी याबाबत जाब विचारला तर त्यालाच गाडीतून खाली उतरविले जाते. याशिवाय एका वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जात आहेत.चिमूर आगारात कर्मचाºयांचे मुंडणचिमूर आगारातील दोनशेच्या वर कर्मचारी संपावर गेले असून आगारात शंभर टक्के संपाला प्रतिसाद मिळाला आहे. आगारातील कामगार संघटना, इंटक, कामगार सेना, कास्ट्राईब संघ, यासह सर्वच संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करीत शुक्रवारी मुंडण करुन प्रशासनाचा निषेध केला. चिमूर आगारात कामगार संघटनेचे शाबीर शेख, सुरेश पोटदुखे, कामगार सेनेचे ताराचंद मत्ते, लता पाकमोडे, एकनाथ घुटके, बन्सोड, दिलीप नन्नावरे, प्रोफेश्वर दिघोरे यांच्या नेतृत्वात संप शांततेत सुरु असून प्रशासनाचा विरोध म्हणून चिमूर आगारातील जावेद शेख, विनोद पडोळे, साधू घोडमारे, काकपूरे, गणेश पेंदरे, जुमनाके, बोबडे या कर्मचाºयांनी मुंडण केले.संपाला काँग्रेसचा पाठिंबाएसटी महामंडळाच्या या संपाला चंद्रपूर शहर व ग्रामीण कांग्रेस कमेटीनेही पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश देवतळे व माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे यांनी आज शुक्रवारी केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत संपावरील कर्मचारी, अधिकाºयांशी चर्चा करून त्यांना पाठिंबा दिला. याप्रसंगी सुभाससिह गौर, नगरसेविका सुनिता लोढिया, शिवा राव, मनपाचे माजी सभापती संतोष लहामगे, अमजद अली ईरानी, भास्कर दिवसे, विनोद संकत, सुनिता अग्रवाल, अनिल सुरपाम, राजेश अडूर, शालिनी भगत, मोहन डोंगरे आदी उपस्थित होते.