शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

झरण वनपरिक्षेत्रात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:47 IST

एफडीसीएमच्या मध्य चांदा अंतर्गत येणाऱ्या बल्लारशाह वनप्रकल्पातील झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १२३, १२४ मध्ये मागील दोन दिवसांपासून वणवा भडकला आहे. यात लाखोंच्या बांबूच्या रांझी व पाच सहा वर्षांपूर्वी रोपवन केलेले मौल्यवान सागाचे रोपटे जळून खाक झाले आहे.

ठळक मुद्देलाखोंची वनसंपदा नष्ट : बांबूच्या रांझी व सागाची रोपटी जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर: एफडीसीएमच्या मध्य चांदा अंतर्गत येणाऱ्या बल्लारशाह वनप्रकल्पातील झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १२३, १२४ मध्ये मागील दोन दिवसांपासून वणवा भडकला आहे. यात लाखोंच्या बांबूच्या रांझी व पाच सहा वर्षांपूर्वी रोपवन केलेले मौल्यवान सागाचे रोपटे जळून खाक झाले आहे. याशिवाय सरपटणारे प्राणी व इतर वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.या घटनेमुळे वनविकास महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होवून महामंडळाला मोठा फटका बसला आहे. वनविकास महामंडळ अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रात येणाºया कक्ष क्र. १२३, १२४ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागून जंगल जळत असताना आगीवर नियंत्रण मिळविण्यात वनकर्मचारी अपयशी ठरले आहेत. मागील दोन दिवसांपासून लागलेली आग जंगलात पसरत असतानाही वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्रधिकारी यापैकी कुणीही घटनास्थळी भेट दिलेली नाही, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. आगीने उग्ररुप धारण करीत बांबूच्या रांझी व साग प्रजातीचे मौल्यवान लहान झाडे आपल्या कवेत घेतले. त्यामुळे वनविकास महामंडळाची लाखो रुपयांची संपती जळून खाक झाली.उल्लेखनीय असे, एफडीसीएमच्या याच क्षेत्रात वनप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यप्राणीसुद्धा या आगीत होरपळून निघाले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासठाी विविध यंत्रणा असूनसुद्धा आगीवर अद्याप नियंत्रण मिळविले नाही. एफडीसीएमची यंत्रणा गेली कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वनकर्मचाºयाच्या दुर्लक्षतेमुळे दिवसेंदिवस आग लागल्याच्या घटना वाढत आहे.गेल्या आठ दिवसांपूर्वी याच वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ८१ मध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.जंगलातील आगीच्या घटना वाढताहेतचंद्रपूर जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. जिल्ह्यातील विविध भागात घनदाट जंगल आहे. ताडोबासारखा मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून जंगलात आग लागल्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. मोहर्ली, लोहारा, नागभीड तालुक्यातील शिवटेकडीमागील परिसर व इतर जंगलात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. वणव्याचा हा प्रकार आणखी वाढू नये, यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचा भार प्रभारीवरझरण वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. धाबा येथील वनाधिकाऱ्यांकडेच झरण वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या अनियमित येण्यामुळे वनकर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही.