शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसगाड्यांचीही स्पॉट व अ‍ॅडव्हान्स बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:18 IST

शहरी व ग्रामीण भागात लालपरी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांनीही कात टाकणे सुरु केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बसची ज्या प्रमाणे एजंट स्पॉट व अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग करतात, त्याच प्रमाणे एसटी महामंडळाने जिथे बसस्थानक नाही, परंतु थांबा आहे, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन स्पॉट व अ‍ॅडव्हान्स बुकींग करणे सुरु केले आहे.

ठळक मुद्देवरोरा आगार : प्रवासी मिळविण्यासाठी महामंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरी व ग्रामीण भागात लालपरी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांनीही कात टाकणे सुरु केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बसची ज्या प्रमाणे एजंट स्पॉट व अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग करतात, त्याच प्रमाणे एसटी महामंडळाने जिथे बसस्थानक नाही, परंतु थांबा आहे, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन स्पॉट व अ‍ॅडव्हान्स बुकींग करणे सुरु केले आहे.स्पर्धेच्या युगात एसटी बस मागे पडत आहे. प्रवाशांची संख्या रोडाविल्याने एसटी महामंडळ तोट्यात चालत असल्याची ओरड सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करावा याकरिता एसटी महामंडळ अनेक नवनवीन उपाय योजना आखत आहे. तर काही कडक नियमही लावण्यात आले आहे. मात्र या नियमांना खासगी प्रवासी वाहतूकधारक बगल देत एसटीचे प्रवाशी पळवून नेत असल्याने एसटी महामंडळास प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. ज्या ठिकाणी एसटी व खाजगी बसचे थांबे आहेत. त्या ठिकाणी खाजगी बसचे एजंट एसटी बसला प्रवासी मिळू देत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसते. खाजगी बसधारक एजंट मार्फत प्रवासी मिळवत असताना वरोरा शहरातील नागपूर, चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकात एसटी महामंडळाने एक कर्मचाºयाची नियुक्ती केली आहे. हा गणवेशधारी कर्मचारी उभे असलेल्या प्रवाशांना जवळ जावून कुठे आयचे आहे, अशी विचारणा करीत एसटी बस किती वेळात येणार, याची माहिती प्रवाशांना देतो. व त्यांना त्या ठिकाणचे अ‍ॅडव्हॉन्स तिकीट देवून एसटी बस आल्यानंतर प्रवाशांना त्याच एसटी बसमध्ये बसविण्याची कार्यवाही मागील काही दिवसांपासून पार पाडत आहे. यामुळे काहीसा खाजगी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.एसटीमध्ये सीट मिळेल काय ?एसटी थांब्याजवळ नियुक्त एसटी कर्मचारी भद्रावती व वरोरा बसस्थानकाशी सातत्याने भ्रमनध्वनीवर संपर्क साधून बस या वेळात पोहचणार याची माहिती देत प्रवाशांची बुकींग करतो. परंतु, त्या एसटी बसमध्ये किती प्रवाशी आहेत, याची अचुक माहिती सदर कर्मचाºयास नसते. त्यामुळे सिझनमध्ये अशी बुकिंग केल्यास बसमध्ये प्रवाशाला सीट मिळेलच याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशाला हमखास सीट मिळाली पाहिजे, याचे नियोजन एसटी महामंडळाने करणे गरजेचे आहे.