चंद्रपूर : कोरोनामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही गरजेचे आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासाकरिता खिलाडूवृत्ती गरजेची आहे. त्यातूनच समाजात संवाद निर्माण होत असतो, असे प्रतिपादन चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.
गोंडवाना स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने गोंडवाना बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नगिनाबाग जुमले ले-आऊट येथे नुकताच पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोलाभाऊ जुमळे, येरावार, विश्वास बनकर, शत्रुघ्न गेडाम, घुटके, मिलिंद हस्तक, असोसिएशनचे अध्यक्ष अत्तदीप भगत, संघटक शैलेश गिरडकर, मकरंद खोब्रागडे, आदी उपस्थित होते. यावेळी १६ वर्षांखालील एकेरी मुले, मुली, पुरुष एकेरी, दुहेरी, महिला एकेरी, आदी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सतीश खोब्रागडे यांनी केले. रुपम निमगडे यांनी आभार मानले.