शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा स्पर्धेमुळे मन व शरीर सुदृढ बनते

By admin | Updated: February 1, 2017 00:38 IST

शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धादेखील महत्त्वाची आहे.

गजानन गावंडे यांचे प्रतिपादन : आंतरशालेय क्रीडा संमेलनाचे उद्घाटनचंद्रपूर : शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धादेखील महत्त्वाची आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भावी क्रीडापटूच्या पाऊलखुणा दिसून येतात. खेळ हा खिलाडू वृत्तीने खेळण्याची यातून प्रेरणा मिळते. सहजीवन यातून अनुभवा येते. क्रीडा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असून क्रीडा स्पर्धेमुळे मन व शरीर सुदृढ बनते, असे प्रतिपादन चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी येथे केले.दी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संचालित न्यू इंग्लिश हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, पांढरकवडा व श्री बालाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बामणी (दुधोली) अंतर्गत स्थानिक न्यू इंग्लिश हास्यकूलच्या क्रीडांगणावर आंतर शालेय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन गावंडे बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन काँग्रेसचे राहुल पुगलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दी एज्यूकेशन सोसायटीचे सचिव वसंत जवळे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, महानगरपालिकेच्या सदस्य सकीना अंसारी, मिना खनके, संजय महाडोळे, प्राचार्य श्रीधर फटाले, प्राचार्य आस्तिक उरकुडे, प्राचार्य अनिता पंधरे, संगीता वैद्य, मनोहर बनसुले यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चांदा रायफल शुटींग क्लबचे आदेश चामलवार, निखील सरकार, अक्षय मोगरे यांनी रायफल शुटींगचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी रामभाऊ टोंगे म्हणाले, विद्यार्थ्यांना एखाद्या टप्प्यावर अपयश येणे साहिजक आहे. अशावेळी सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन वाटचाल करावी. यशाच्या प्रयत्नात चुका होणार नाही, याची काळजी घ्यावी. यातून इच्छित ध्येय गाठता येते, असे ते म्हणाले. राहुल पुगलिया यांनी रायफल शुटींगचे प्रात्यक्षिक व पतंग महोत्सवात उपस्थितीत राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून प्राचार्य श्रीधर फटाले यांनी क्रीडा संमेलनाची भूमिका विशद केली. संचालन संगीता वैद्य यांनी केले. (शहर प्रतिनिधी)