नागभीड : लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबुजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत वृत्तपत्र समूह आणि भांगडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त १९ जुलै रोजी नागभीड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २४ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
तालुका भाजपाच्या कार्यालयात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन नागभीड न. प.चे नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे यांनी केले. उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर, कृउबासचे सभापती अवेश पठाण, न. प.चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, तालुका भाजपचे अध्यक्ष संतोष रडके, नगरसेवक रूपेश गायकवाड, दशरथ उके यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
रूपेश गायकवाड, सचिन आकुलवार, आनंद भरडकर, मुकेश धनवाल, उमेश बोकडे, किरण मेंढे, मोहसीन नुरानी, जागेश्वर नागोसे, प्रवीण डाहारे, चंद्रशेखर ठाकरे, अंकुश गावतुरे, नामदेव ठाकरे, प्रणय मेंढे, राजू कामठे, रवींद्र पोलकमवार, राकेश दडमल, राजेश घिये, गोपाल खामदेवे, पृथ्वीराज लोखंडे, अरविंद नागपुरे, विक्रम मिसार, सुमित कांबडे, विशाल गोपाले, नावेद खान.