शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग रूग्णालय उभारणीच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:47 IST

चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनचे रूग्णालय उभारण्याच्या कामास गती द्यावी. जमीन हस्तांतरण आणि निधीची पूर्तता तातडीने करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देमुंबईत घेतला आढावा : सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनचे रूग्णालय उभारण्याच्या कामास गती द्यावी. जमीन हस्तांतरण आणि निधीची पूर्तता तातडीने करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले.चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने टाटा ट्रस्ट सुसज्ज कॅन्सर रूग्णालय उभारत आहे. या संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस संबंधित डॉक्टर आणि अधिकारी यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांना व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रूग्णालयाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. या बैठकीस फाउंडेशनचे संचालक आशिष देशपांडे आणि राघवन शास्त्री, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, वित्त विभागाचे सचिव मुग्धा धुरी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवाते, टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे संचालक डॉ. आर.ए. बडवे आदी उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, १२० रूग्णांसाठी खाटांची व्यवस्था असलेले बाह्य रुग्ण विभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह लॅब, सुसज्ज आॅपरेशन थिएटर, रूग्णालातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी निवासस्थान, असे सुसज्ज रूग्णालय चंद्रपूर येथे टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन उभारणार आहे. अनेक गरजू गरीब रूग्णांना याचा भविष्यात लाभ होणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. हे रूग्णालय उभारण्यासाठीची जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आणि निधी वितरण तातडीने करावे, असेही त्यांनी संबंधितांना सांगितले.