शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून केली शाळेची भिंत बोलकी

By admin | Updated: May 26, 2017 00:15 IST

गावाशी कोणतेही नाते नसताना अमेरिकेत स्थायिक झालेल्या राजशेखर चिंतापल्ली यांनी थेट सातासमुद्रापलिकडून

ग्रामस्थांचा सहभाग : भिंतीही देत आहेत विद्यार्थ्यांना संदेशलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गावाशी कोणतेही नाते नसताना अमेरिकेत स्थायिक झालेल्या राजशेखर चिंतापल्ली यांनी थेट सातासमुद्रापलिकडून कोरपना तालुक्यातील हेटी येथील जिल्हा परिषद शाळेला पाच हजार रुपयांची मदत पाठविली होती. त्यांचा आदर्श घेऊन गावकऱ्यांनीसुध्दा लोकवर्गणी गोळा केली. त्यातून शाळेच्या संरक्षण भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली. शाळेच्या बोलक्या संरक्षण भिंतीमुळे विद्यार्थी हसतखेळत शिकू लागले आहेत. यातून येथील गावकऱ्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. मुख्याध्यापक अरुण उमरे यांचे मित्र राजशेखर चिंतापल्ली हे अमेरिकेमध्ये मोठ्या पदाच्या नोकरीवर आहेत. त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे शाळेला पाच हजार रुपयांची मदत पाठविली. तसेच कामठी येथील मनीष नेवारे यांनी त्यांच्या प्रदीप्ती नावाच्या मुलीच्या आग्रहाखातर शाळेला मदत पाठविली. या बाहेरून येणाऱ्या मदतीने गावकरी भारावले. बाहेरचे व्यक्ती आपल्या गावातील शाळेला मदत करीत आहे, तेव्हा आपणही शाळेसाठी काहीतरी केले पाहिजे, असे गावकऱ्यांना वाटले. यावर गावकऱ्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला व शाळेला आणखी चांगले बनविण्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २५ हजारांचा निधी गोळा केला. या निधीतून शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. परमडोह येथील कलावंत रवींद्र ठाकरे यांनी उत्तम असे रेखाचित्र काढली.विद्यार्थी शाळेत आल्यावर प्रसन्न असल पाहिजे, शाळेच्या वास्तूतूनही त्यांना काहीतरी शिकायला मिळाले पाहिजे, या हेतूने ही रंगरंगोटी करण्यात आली. शाळेची सुरक्षा भिंत व इतर भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. या शाळेची प्रत्येक भिंत काही ना काही संदेश देते.हेटी येथील ही शाळा कोरपना-वणी मार्गावर आहे. या मार्गाने येता-जाता कोरपना येथील आयटीआयचे प्राचार्य संजय तेलतुमडे, रमेश बोरडे, नेलाकूर्ती कोंडय्या सावकार हेदेखील शाळेच्या बोलक्या भिंतीने भारावले व त्यांनी शाळेला आर्थिक मदत देऊ केली. अध्ययनासोबतच या शाळेतील विद्यार्थी चालता-बोलता, हसता-खेळताही काही ना काही शिकत आहेत. शाळेत अनियमित असणारे विद्यार्थीही आता नियमित झाले आहेत.